Samruddhi Mahamarg Inauguration: नागपूर ते नाशिक केवळ ६ तासांत; समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज होणार खुला
Samruddhi Mahamarg updates: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर आज दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. या मार्गामुळे नागपूर-ते नाशिक अंतर हे केवळ ६ तासांत पोहचता येणार आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महामार्गाचं आज उद्घाटन होणार आहे.
Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या दुसरा टप्प्याचे आज उद्घाटन होणार आहे. शिर्डी ते भरवीर असा हा टप्पा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या मार्गाचे उद्घाटन आज होणार आहे. या मार्गामुळे शिर्डी ते भरवीर अंतर केवळ ४० ते ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Jejuri : जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी, आज आंदोलन
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर २०२२ ला नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार शिर्डी ते भरवीर या ८० किमीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले. दरम्यान, हा बहुउद्देशी प्रकल्प असून या मार्गाद्वारे केवळ हे अंतर केवळ ७ तासांत पार करता येणार आहे. या मार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले होते. त्यानंतर या हामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून आज या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे.
MiG 29K विमानान केलं रस्त्रीच्या वेळी आएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग, नौदलाची लढाऊ क्षमता वाढणार
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. नागपूर ते शिर्डी हा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे ८० किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
शिर्डी ते भरवीर पर्यंतचा ८० किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. २०२४ पर्यंत समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचे सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे.