Samruddhi Mahamarg Accident :समृद्धी महामार्गावरअपघाताचे सत्र सुरूच आहे. या महामार्गावर आजपुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार येऊन आदळल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात दोनजणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात हा अपघात आहे. अपघातइतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधून पाच जण प्रवास करत होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वाशिममधीलसमृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला.काहीतरी बिघाड झाल्यामुळे चालकानेट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार ट्रकवर आदळली.या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झालातर तीन जणजखमी झाले.
मृतांमध्ये ४५ वर्षीय वडील आणि त्यांच्या ७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. जखमींमध्ये २ महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईकडे चालली होती. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. आतील लोक कारमध्येच अडकून पडले होते.अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारचा समोरील भाग कटरने कापून आतील मृत व्यक्ती व जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून आतापर्यंत तब्बल १७ हजार २५५ अपघात झाले आहेत. या अपघातात २१५ जणांना जीव गमवावा लागला आहे.
नागमोडी वळणे नसून सरळसोट रस्ता असल्याने या मार्गावरून वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. अतिवेगामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजण्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अपघातांची कारणेही शोधण्यात आली आहेत. त्यामध्ये चालकाला वाहन चालवताना लागलेली डुलकी, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक सामान भरलेली वाहने (ओव्हरलोड), ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह,ताण,सरळ रस्त्यामुळे रोडहिप्नॉसीस (संमोहनावस्था) आणि वाहनचालकाचे झालेले दुर्लक्ष ही प्रमुख कारणे आहेत. अपघात कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विविध उपाय योजले आहेत.