मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna Accident: समृद्धी महामार्गावर दोन वाहनांची ऐकमेकांना धडक, सात जणांचा मृत्यू, ३ जखमी

Jalna Accident: समृद्धी महामार्गावर दोन वाहनांची ऐकमेकांना धडक, सात जणांचा मृत्यू, ३ जखमी

Jun 29, 2024 12:17 PM IST

Samruddhi Mahamarg Accident: जालना कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारच्या अपघात सात जणांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात दोन कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू
जालन्यात दोन कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू

Jalna Accident News: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. जालना कडवंची गावाजवळ दोन वाहनांच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच.१२. एमएफ. १८५६) आणि ईरटीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी. ५४७८) यांच्यात भीषण अपघात झाला. ईरटीका कार नागपूरहून मुंबईकडे निघाली होती. तर, स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरून विरुद्ध दिशेने येत होती. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही कारचा अशरक्ष: चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर समृद्धी माहामार्गावर वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साह्याने दोन्ही कार बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसूरी, अल्थमेश मंसूरी , प्रदीप लक्ष्मण मिसाळ, संदीप माणिक बुधवंत, विलास सुभाष कार्यदे असे मृतांची नावे आहेत. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकले नाही. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुणे: अल्पवयीन टँकर चालकाने नागरिकांना उडवले

पुण्यातील वानवडी परिसरात आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अल्पवयीन टँकर चालकाने नागरिकांना उडवले मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी दुचाकीने जात होते. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्यावेळी अचानक मागून आलेल्या भरधाव टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ढुमे यांच्या पत्नी खाली पडल्या. तर, दोन मुली टँकर खाली आल्या. सुदैवाने, त्यांना मोठी दुखापत झाली नाही. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या अल्पवयीन टँकर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

WhatsApp channel
विभाग