Samruddhi Mahamarg Accident : विकासाचा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र, हा महामार्ग सुरू झाल्यापासून या मार्गावर अपघातांची देखील मालिका सुरू झाली आहे. आतापर्यंत या मार्गावर १७ हजार पेक्षा जास्त अपघात झाले असून यात २१५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. डुलकी लागल्याने, टायर फुटल्याने तसेच प्राण्यांनी दिलेल्या धडकेमुळे हे अपघात झाले, असल्याची माहिती समृद्धी महामार्ग व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत आहे. या सातत्याने सातत्याने अपघात होत आहेत. या मार्गावर झालेल्या अपघाताच्या घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघतांमुळे सरकार देखील चिंतित असून यासाठी विविधी समित्या तयार करून या मार्गावरील अपघाताची कारणे शोधून उपाय योजना देखील करण्यात आला. मात्र, असे असले तरी या मार्गावरील अपघात कमी झालेले नाहीत. या मार्गावर आतापर्यंत १७,२५५ अपघात झाले आहेत. यात २१५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर आता पर्यंत १७ हजार २५५ अपघातांची नोंद झाली आहे. यातील १८७१ अपघात हे कमी तिव्रतेचे तर १२५१ अपघात हे जास्त तिव्रतेचे होते. यातील काही अपघातात २१५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर झालेल्या सर्व अपघातांची आकडेवारी देखील पुढे आली आहे. २६५७ अपघात हे वाहनांची धडक होऊन झाले आहेत. हा महामार्ग विदर्भातील मोठ्या अभयारण्यातून जातो. त्यामुळे या मार्गावर जंगली प्राण्यांचा देखली वावर असतो. या प्राण्यांना वाहने धडकल्याने २१७६ अपघात झाले आहेत. तर १२१ अपघात हे वाहनांना आग लागल्याने झाले आहेत. सर्वाधिक अपघात हे ब्रेक फेल झाल्यामुळे झाले आहेत. तब्बल १२२३२ अपघात हे ब्रेकफेल झाल्यामुळे घडले आहेत.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई अंतर हे सात तासांवर आले आहेत. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने येजा करत असतात. मुंबई पुण्यातील अंतर जरी या मार्गामुळे कमी झाले असले तरी विविध कारणांमुळे या मार्गावरील अपघात वाढले आहेत. यात प्रामुख्याने वाहन चालवतांना झोप येणे, हाय स्पीड, रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरलोड, ड्रंक अँड ड्राइव्ह, स्ट्रैस, रोड हायप्नोसीस आणि डिस्ट्रॅक्शन ही प्रामुख्याने अपघात होण्याची कारणे आहेत.
समृद्धी महामार्गामुळे प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. हा महामार्ग अभयरण्यातून जात आहे. वन्यप्राणी या मार्गावर येऊ नये यासाठी विशेष कॉरिडोअर देखील तयार करण्यात आले. मात्र, असे असतांना देखील अनेक प्राणी या मार्गावर येत असतात. त्यामुळे आतापर्यंत विविध अपघातात २३८५ प्राण्यांचा मृत्यू झाला. तर ६५ प्राणी हे जखमी झाले. वन्यप्राणी धडकुन २१७६ अपघात झाले आहेत.