मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, वाशिम जवळ ३ जणांचा जागीच मृत्यू

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, वाशिम जवळ ३ जणांचा जागीच मृत्यू

Jun 03, 2024 12:16 PM IST

accident near washim on Samriddhi highway : समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच आहेत. या मार्गावर उभ्या नादुरुस्त ट्रकला भरधाव वेगात असणारी कार पाठीमागून धडकली असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर नादुरुस्त ट्रकला भरधाव वेगात असणारी कार पाठीमागून धडकली असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर नादुरुस्त ट्रकला भरधाव वेगात असणारी कार पाठीमागून धडकली असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

accident near washim on Samriddhi highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. सोमवारी सकाळी या अपघातात तिघे जण ठार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाशिमच्या समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवर हा अपघात झाला आहे. या मार्गावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने भरधाव कारने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूत घुसला. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune viral video : पुणे पोलिसांचा प्रताप! नाकाबंदी दरम्यान युवकाकडून पाय दाबून घेतले पाय, कल्याणीनगर येथील घटना

समृद्धी महामार्गावर आज सोमवारी मालेगांवच्या वाशिम मार्गावरील रिधोरा इंटरचेंजजवळ हा ट्रक उभा होता. यावेळी एक कार भरधाव वेगात आली. रस्त्यावर उभा असलेला ट्रकचा अंदाज अपघातग्रस्त कार चालकाला आला नाही. यामुळे भरधाव वेगात असणारी ही कार थेट ट्रकच्या मागच्या बाजूला धडकली. या कारचा समोरील अर्धा अधिक भाग हा ट्रक खाली घुसला. यात कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

SL vs SA Pitch Report : न्यूयॉर्कमध्ये श्रीलंका-आफ्रिका भिडणार, किती धावा निघणार? सामन्याची वेळ, जाणून घ्या

या घटनेची माहिती पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन मृतकांपैकी कार मधील मागील मृतदेह काढून ते मालेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तर कारच्या पुढील सीटवर बसलेला चालक आणि व एकाचा मृतदेह कारमध्येच फासला होता. हे मृतदेह जेसीबीच्या साह्याने काढण्यात येणार आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. यामुळे ही कार कापून त्यातील अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेले नाही. त्यांची नावे देखील समजू शकली नाहीत. ही कार व त्यातील मृत व्यक्ति हे अमरावती जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे. या अपघातग्रस्त कार मधून तिघे जण प्रवास करत होते. अपघाता नंतर हायवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४