Sambhajinagar Honor Killing: संभाजीनगर ऑनर किलींग ने हादरले! मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar Honor Killing: संभाजीनगर ऑनर किलींग ने हादरले! मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं

Sambhajinagar Honor Killing: संभाजीनगर ऑनर किलींग ने हादरले! मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं

Jul 27, 2024 07:57 AM IST

Sambhajinagar Honor Killing : संभाजीनगर येथे मुलीने आंतरधर्मीय लग्न केल्यानं संतापलेल्या बापाने जावयाची भोसकून हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

संभाजीनगर ऑनर किलींग ने हादरले! मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं
संभाजीनगर ऑनर किलींग ने हादरले! मुलीनं आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्यानं बापानं जवायला संपवलं

Sambhajinagar Honor Killing : तुम्ही सैराट चित्रपट पाहिला असेलच. मुलीने पळून जाऊन आंतरधर्मीय आणि आंतर जातीय लग्न केल्यामुळं संतापलेल्या बापाने मुलीची व जावयाची गळाचिरून हत्या केली. अशाच एका घटनेने संभाजीनगर हादरले आहे. जात-धर्म न पाहता बालपणीच्या मैत्रिणीसोबत आंतर जातीय विवाह केल्याने संतापलेल्या बापाने मुलीच्या चुलत भावासह जावयाची भर रस्त्यात भोसकून हत्या केली.

अमित मुरलीधर साळुंके असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. तर वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर दोघेही आरोपी फरार झाले आहेत. ही घटना १४ जुलै रोजी शहरातील इंदिरानगरमध्ये घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेला जावई याची १२ दिवसांच्या मृत्यूशी झुंज देतांना शुक्रवारी प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार अमितहा १४ जुलै रोजी शहरातून जात असतांना त्याच्या पत्नीच्या वडिलांनी व चुलत भावाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करत त्याला चाकूने भोसकले होते. यात अमित हा गंभीर जखमी झाला होता. तब्बल १२ दिवसांपासून अमित हा मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, गुरुवारी येथील घाटी रुग्णालयात अमितची प्राणज्योत मालवली.

काय आहे प्रकरण ?

अमितचे त्याची बाल मैत्रीण असलेली विद्या हीच्या सोबत प्रेमसंबंध होते. पण दोघांची जात आणि धर्म वेगळा होता. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती विद्याच्या घरी समजली. त्यांनी दोघांच्याशी नात्याला व लग्नाला विरोध केला. मात्र, दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारून देऊन एप्रिल महिन्यात त्यांनी पळून जाऊन लग्न केले. दरम्यान, अमितच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली. २ मे रोजी ते घरी परतल्यावर त्यांच्या संसार सुखाचा चालला होता. अमितच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला स्वीकारले असले तरी विद्याच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. विद्याचे वडील आणि चुलत भावाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने विद्याच्या वडिलांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी व विद्याचा चुलत भाऊ याच्याशी मिळून १४ जुलै रोजी अमितवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करून त्याला भोसकले होते. यात अमित गंभीर जखमी हलयाणे त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल १२ दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडील आणि भावाचा शोध घेत आहेत. दोघेही फरार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर