Sambhajinagar: आईच्या आत्महत्येची बातमी समजताच मुलीची विहिरीत उडी, संभाजीनगरातील मन सुन्न करणारी घटना!-sambhajinagar girl jumped into well after mother suicide in khuldabad ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar: आईच्या आत्महत्येची बातमी समजताच मुलीची विहिरीत उडी, संभाजीनगरातील मन सुन्न करणारी घटना!

Sambhajinagar: आईच्या आत्महत्येची बातमी समजताच मुलीची विहिरीत उडी, संभाजीनगरातील मन सुन्न करणारी घटना!

Sep 06, 2024 09:31 AM IST

Daughter and Mother Suicide In Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरामधील खुलताबाद येथे आईच्या मृत्युनंतर मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

आईच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर मुलीनेही संपवलं जीवन
आईच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर मुलीनेही संपवलं जीवन

Sambhajinagar Khuldabad Suicide News: छत्रपती संभाजीनगरामधील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे गुरुवारी रात्री धक्कादायक घटना घडली. आईच्या आत्महत्येनंतर मुलीनेही विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. एवढेच नाहीतर, आई आणि बहिणीच्या मृत्युची बातमी समजताच गावी निघालेल्या भावाचाही अपघात झाला असून तो गंभीर जखमी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

वंदना भरत दुधारे (आई) आणि पल्लवी भरत दुधारे अशी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत आपल्या कुटुंबासह गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. गुरुवारी रात्री सर्व कामे आटपून वंदना आणि पल्लवी झोपायला गेल्या. सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. त्यावेळी जवळच्या विहिरीत तिला आईचा मृतदेह आढळून आला. आईच्या मृत्युचा विरह सहन न झाल्याने पल्लवीनेही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. माय-लेकीच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

वाढत्या आर्थिक कर्जाला कंटाळून बहीण- भावाची हत्या

चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट शहरात वाढत्या आर्थिक कर्जाला कंटाळून ५२ वर्षीय महिला आणि तिच्या ५० वर्षीय भावाने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, घर आणि शेतीचा खर्च भागवण्यासाठी या भावंडांनी महिला बचत गट आणि अनेक सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्यांचे पीक वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना कर्ज फेडणे अवघड झाले. दुसरीकडे सावकारांकडून परतफेडीची मागणी वाढली.

उपचारदरम्यान दोघांचाही मृत्यू

दरम्यान, बहीण- भावानं बुधवारी विष प्राशन केले. मात्र, त्यानंतर त्रास होऊ लागल्याने महिलेने मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक मारली. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री महिलेचा मृत्यू झाला, तर गुरुवारी सकाळी भावाचा मृत्यू झाला. या दोघांनी खासगी सावकार आणि बचत गटांकडून सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पारशिवमूर्ती यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

विभाग