मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhatrapati Sambhaji Nagar : २३ वर्षीय तरुणी कार चालवताना बनवत होती रिल्स अन् जवळच खोल दरी.. पुढं जे घडलं खूपच भयानक

Chhatrapati Sambhaji Nagar : २३ वर्षीय तरुणी कार चालवताना बनवत होती रिल्स अन् जवळच खोल दरी.. पुढं जे घडलं खूपच भयानक

Jun 17, 2024 09:01 PM IST

Sambhaji nagar Accident : कारमध्ये बसून रिल्स बनवणे या तरुणाला चांगलंच महागात पडलं. खोल दरीत कोसळून या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ घडली.

कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू
कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

Sambhaji Nagar Accident : तरुणाईमध्ये सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याची मोठी क्रेझ आहे. सोशल मीडियावरील लाईक्स व कमेंटमधून प्रसिद्धीचे मोजमाप केले जात आहे. मात्र यासाठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालून अशा रिल्स बनवत असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजी नगरमधूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. 

एका २३ वर्षीय तरुणाला रिल बनवणं जीवावर बेतलं आहे. गाडी चालवतानाची रिल्स तिच्या आयुष्यातील अखेरची रिल ठरली आहे. ते रिल्स पाहण्यासाठी ती आता या जगात नाही. रिल बनवतानाच तिचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला. 

ट्रेंडिंग न्यूज

कार दरीत कोसळून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव आहे. श्वेता व तिचा मित्र शिवराज मुळे हे दोघे संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवताना तिने मित्राला सांगितले की, मी कार चालवते तू त्याची रिल बनव. तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिनं कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार पाठीमागे असलेल्या दरीत कोसळली.

कारमध्ये बसून रिल्स बनवणे या तरुणाला चांगलंच महागात पडलं. कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असताना रील बनवत होती. रिल बनवताना तिनं गाडी पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच तिचा घात झाला. 

तरुणी कार चालवताना समोर उभ्या असलेल्या मित्राला रिल्ससाठी कॅमेरा शूटींग करायला सांगत होती. समोरच्या व्यक्तीने कॅमेरा चालू केला. तरुणीने कार रिवर्स घेतली. पण नको ते घडलं. कारवरचा तिचा ताबा सुटला अन् कार रिव्हर्स जात दरीत कोसळली.  या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणी छत्रपती संभाजी नगर शहरातील रहिवासी होती. सोमवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी अन्य पर्यटकही उभे होते. 

रिल बनवताना तिच्याकडून रिव्हर्स गिअर पडला. एक्सलेटवर पाय दाबला गेला. यानंतर तिचा मित्र क्लच दाब म्हणून ओरडत राहिला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरीत कोसळल्याने कारचा पार चुराडा झाला. कार डोंगरावरुन पलटी होत खाली गेली. 

संभाजीनगरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यात निसर्गरम्य असतो. त्यामुळे अनेक पर्यटक येथे येत असतात. तसेच अनेत तरुण-तरुणी खास रिल्स बनवण्यासाठी येथे गर्दी करत असतात.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर