Sambhaji Raje On Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चानंतर सरकार पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. आज या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराडला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असताना त्यांचे पक्षाध्यक्षअजित पवार मौन बाळगून आहेत, यावरसंभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.
वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अजित पवार या संपूर्ण प्रकरणावरगप्प का आहेत?तेया प्रकरणी काबोलत नाहीत? धनंजय मुंडे यांचे संरक्षण अजित पवार का करत आहेत? वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला हे सीआयडीचं यश नाही. २२ दिवस तो हाती लागत नाही. काल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि आज तो पोलिसांसमोर हजर होतो. याच्या मागे काही तरी दडलंय का?हादेखील तपासाचा भाग आहे, अशी शंका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकवर १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा नोंद करून चालणार नाही. त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. खंडणीच्या गुन्ह्यामुळे उद्या जामिनावार तो बाहेर आल्यास हा खेळखंडोबा आम्ही पाहणार नाही. तुम्ही मोक्का, खुनाचा गुन्हा कसा लावणार याचं स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावं. वाल्मिकवर मोक्का लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. पुणे पोलिसांच्या तपासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इतके दिवस वाल्मिक कराड पुण्यात असताना त्यांना कळलं कसं नाही अशी विचारणा त्यांनी केली आहे.
बीडचं पालकमंत्री कोणी व्हावं हे मुख्यमंत्र्यांनी पाहावं. धनंजय मुंडे पालकमंत्री होऊन चालणार नाही. त्यांनी लोकांना न्याय दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रिपद घेतलं तरी स्वागत करू,असे संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले.
संबंधित बातम्या