Sambhaji Raje: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचे नाव घेत म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Raje: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचे नाव घेत म्हणाले...

Sambhaji Raje: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचे नाव घेत म्हणाले...

Published Oct 06, 2024 07:39 PM IST

Sambhaji Raje On Chhatrapati Shivaji Maharaj Statue: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे भडकले
मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे भडकले

Mumbai Arabian Sea Chhatrapati Shivaji Maharaj Statue: छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी दौरा आयोजित केला. यानंतर ते संभाजीराजे आज हजारो शिवभक्तांसह सकाळी पुण्याहून मुंबईत आले. परंतु, संभाजीराजे हे मुंबईत दाखल होताच त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. आठ वर्षांपूर्वी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली. मात्र अजूनही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराराजांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केला जातो. मात्र, यावेळी मी असे होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी राजेंनी दिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन केले होते. मात्र, आठ वर्षे उलटली शिवाजी महाराजांचे स्मारक दुर्बिणीतूनही दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांनी येथे स्मारक व्हावे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. गडकोट किल्ल्यांवर कोणी बोलत नव्हते. पण निवडणुकीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाचा वापर करून मत मागितले जातात. मात्र, यावेळी हे मी होऊ देणार नाही. सरदार पटेल यांचे स्मारक झाले. पण शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

 

केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात २१२ मीटर उंच अश्वारुढ पुतळा उभारण्याची घोषणा केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये जलपूजनाच्या कार्यक्रम घेतला. शिवस्मारकाचे काम एल अँड टी कंपनीला ३ हजार ६४३ कोटी रुपयांत देण्यात आले. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात 7.1 हेक्टर एवढ्या जागेवर महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर