Sambhaji Raje Chhatrapati not reacheble from last five days: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी येत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासूंन नॉट रीचेबल आहेत. त्यांनी ३ जानेवारीपासून त्यांचे सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम रद्द केले आहे. दरम्यान, ते नेमके कुठे आहेत याची माहिती कुणालाही नाही. दरम्यान, त्यांच्या या अचानक गायब होण्यामुळे राज्यभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
संभाजी राजे छत्रपती यांना कोल्हापूर येथील लोकसभा निवडणूक लढवायची आहे. या साठी महावीकास आघाडीतून उमेदवारी संदर्भात त्यांच्या चर्चा सुरू आहे. अद्याप यावर योग्य तोडगा निघालेला नाही. दरम्यान, ३ जानेवारीला त्यांनी ट्विट करत सर्व कार्यक्रम रद्द करणार असल्याचे सांगितले.
संभाजी राजे छापत्रपती यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचे उद्घाटन देखील होणार होते. मात्र, कारणास्तव सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व!, असे ट्विट त्यांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते कुठे आहेत, काय करत आहेत याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देखील माहिती नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी संभाजी राजे छत्रपती हे इच्छुक आहे. या साठी ते आग्रही आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ते नाराज असल्याचे समजत असून कदाचित याच कारणामुळे ते नॉट रीचेबल असल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांचा ११ तारखेला वाढदिवस आहे. या दिवशी तरी ते हजर राहणार का ? या कडे सर्वांच्या नजरा आहे. दरम्यान, त्यांच्या करकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू केली आहे. जर ते आले तर ते काय भूमिका घेतील यावरून देखील चर्चा सुरू आहेत.