मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar: पत्नीच्या अफेअरबाबत कळालं, समजावूनही तिनं ऐकलं नाही; नैराश्‍यातून पतीची आत्महत्या

Sambhaji Nagar: पत्नीच्या अफेअरबाबत कळालं, समजावूनही तिनं ऐकलं नाही; नैराश्‍यातून पतीची आत्महत्या

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 21, 2023 03:51 PM IST

Sambhaji Nagar Man Suicide: संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यात पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैगातून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Sambhaji Nagar Suicide News: छत्रपती संभाजी नगरातील सिल्लोड तालुक्यात रविवारी धक्कादायक घडली. पत्नीच्या अनैतिक संबंधाला त्रस्त झाल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सिल्लोड शहरालगतच्या रजाळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या भावाने त्याची वहिनी आणि तिच्या प्रियकराविरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गंगाराम आरके (वय, ३०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रदीपचे सात वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी लग्न झाले. त्यांना दोन मुली आहेत. परंतु, अनिता हिचे गावातील भाऊसाहेब आरके याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे प्रदीपला कळाले. यानंतर प्रदीपने अनिताला अनेकदा समजावूनही तिने ऐकले नाही. अनिता आणि भाऊसाहेब यांनी प्रदीपला मानसिक त्रास दिला. यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रदीपने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास प्रदीपचा भाऊ प्रकाश शेतात गेला असता प्रदीप त्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

प्रकाशला प्रदिपच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. या सुसाईट नोटमध्ये प्रदीपने त्याच्या मृत्युला त्याची पत्नी अनिता आणि तिचा प्रियकर भाऊसाहेब जबाबदार असल्याचे लिहिले. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मृताची पत्नी अनिता आरके तिचा प्रियकर भाऊसाहेब आरके यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

WhatsApp channel