Sambhaji Nagar: इन्स्टाग्रामवर रील पाहत होती, दिसले स्वत:चे 'तसले' फोटो; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Sambhaji nagar minor girl photos Viral: महाविद्यालतील अल्पवयीन मुलीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhaji nagar News: छत्रपती संभाजी नगरातील नामांकित महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली . याप्रकरणी पीडिताने महाविद्यालयातील ३ सिनिअर विद्यार्थ्यांविरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर, एक जण अद्याप फरार असल्याची माहिती आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उस्मानपुरा भागातील नामांकित महाविद्यालयात इयत्ता बारावीचे (विज्ञान शाखा) शिक्षण घेत असून ती महाविद्यालयाच्या वसतीगृहातच राहते. तिची महाविद्यालयातील सिनियर असलेल्या अनिकेत राठोड, कुणाल बावत, उमेद पाशा यांच्याशी ओळख झाली. दरम्यान, या तिघांनी १५ जून रोजी पीडिताला महाविद्यालयाच्या जवळील गार्डनमध्ये भेटण्यासाठी बोलावले. पीडिताची त्यांच्यासोबत चांगली मैत्री असल्याने ती देखील त्यांना भेटायला गेली. यावेळी या तिघांनीही तिचे न्यूड फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब पीडिताच्या लक्षात येताच तिने स्थानिक पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.
पीडिताच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध पॉस्को, आयटी अॅक्टसह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर, एक जण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संबंधित महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विभाग