Sambhaji bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात; संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, महिलांवरही बोलले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात; संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, महिलांवरही बोलले!

Sambhaji bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात; संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, महिलांवरही बोलले!

Updated Oct 03, 2024 04:59 PM IST

Sambhaji Bhide : मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु समाज. गणपती उत्सव,नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

संभाजी भिडे
संभाजी भिडे

Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा हिंदूंबाबत वादग्रस्त विधान करत खळबळ माजवली आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु समाज,असं वक्तव्य भिडे यांनी केल आहे. गणपती उत्सव,नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत. राजकारण,सत्ताकारण,अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे” असं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

नवरात्रोत्सावानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्न करताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्त्व्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.काही माता-भगिनी यांनी यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असे म्हणत त्यांनी यापुढे दुर्गामाता दौडीत महिला व मुलींना परवानगी नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. भिडे म्हणाले की, आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व सण-उत्सवांचा नाश करत चालले आहेत.

शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडू बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही” असं संभाजी भिडे म्हणाले.

हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान मिळणं दुर्दैव -

जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत आपल्या देशावर ७६ राष्ट्रांनी आक्रमणं केली आहे. ते आता पाटलाग करत असून आपण पाय लाऊन पळत आहोत. हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई-भाई,हिंदुंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात” असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं.

पोलिसांनीही टोप्या घालून दौडीत पळालं पाहिजे -

राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे. दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत पळालं पाहिजे, असंही भिडे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर