मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Bhide : मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला; काळे झेंडेही दाखवले

Sambhaji Bhide : मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला; काळे झेंडेही दाखवले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 01, 2024 10:00 AM IST

Sambhaji Bhide News : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide (HT)

Sambhaji Bhide attacked by mob in Manmad : नाशिकच्या मनमाड येथे गुरुवारी रात्री मोठी घटना घडली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. भीम अनुयायांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. भिडे यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. 

ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. भिडे गुरुजी हे येवला येथून मालेगावला जात असतांना आंबेडकर अनुयायी त्यांची गाडी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने या हल्ल्यातून ते बचावले.

Maharashtra weather update : मार्च मध्येही अवकाळीचे ढग कायम! आज राज्यात बहुतांश ठिकाणी बरसणार; 'या' जिल्ह्यात गारपीट

मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे गुरुजी हे मालेगावला एका कार्यक्रमाला जात होते. यावेळी त्यांच्या गाडीचा ताफा हा मनमाड येथे आला असता, भीम अनुयायांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना जमावाने काळे झेंडे दाखवत संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. हातात भिडे यांचे निषेध करणारे काळे झेंडे आणि बॅनर देखील काही तरुण घेऊन आले होते. यातील काही तरुणी आणि तरुणांनी भिडे यांची गाडी अडवली.

या वेळी संभाजी भिडे ही पुढील सीटवर बसलेले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला केला. काचावर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोरात हाताने मारण्यात आले. यात त्यांच्या गाडीची काच फुटली. तर एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. यावेळी पोलिसांकडून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस घटनास्थळी असल्याने त्यांनी तातडीने जमावाला पांगवले. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे गुरुजी पुढे मालेगावच्या दिशेने निघाले. दरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी

WhatsApp channel

विभाग