Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली व निकालही लागला. आता आचारसंहिता संपताना अनेक विभागात सरकारी नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. समाज कल्याण पुणे विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी इच्छुक उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. समाज कल्याण विभागात २१९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.
राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी २१९ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्यासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे, तुम्ही जर पदवीधर असाल तर आजच जाहिरात वाचून नोकरीसाठी अर्ज करू शकता.
समाज कल्याण विभागाकडून 'गृहपाल', वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक‘ आदि पदाच्या २१९ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ३० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – ०५
गृहपाल (महिला) - ९२
गृहपाल (सर्वसाधारण) –६१
समाज कल्याण निरीक्षक -३९
उच्चश्रेणी लघुलेखक -१०
निम्नश्रेणी लघुलेखक – ०३
लघुटंकलेखक -०९ या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.