मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला टार्गेट का केले? घरावर हल्ला का केला?; १७०० पानी आरोपपत्रातून खऱ्या कारणांचा खुलासा

लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला टार्गेट का केले? घरावर हल्ला का केला?; १७०० पानी आरोपपत्रातून खऱ्या कारणांचा खुलासा

Jul 09, 2024 11:39 AM IST

salman khan lawrence bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सतत धमक्या येथ असल्यामुळे सलमान खानचे कुटुंबिय भयभीत राहत असल्याचे अभिनेता सलमान खानने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या १७०० पानी चार्जशीट मधून सलमानवरील हल्याचे कारण देखील स्पष्ट झाले आहे.

लॉरेंस बिश्नोईंनं सलमान खानवर का केले हल्ले ? १७०० पानी चार्जशिटमध्ये खऱ्या कारणांचा झाला खुलासा
लॉरेंस बिश्नोईंनं सलमान खानवर का केले हल्ले ? १७०० पानी चार्जशिटमध्ये खऱ्या कारणांचा झाला खुलासा

salman khan lawrence bishnoi : एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपी आणि तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन वाँटेड व्यक्तींविरुद्ध १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.

सलमान खानने या प्रकरणी म्हटले की, त्याने काहीही चुकीचे केले नाही, तरीही त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला टार्गेट करून त्रास दिला जात आहे. आरोपपत्रानुसार, सलमानने त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्याचे कारण देखील सांगितले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला सलमान कडून पैसे उकळयचे होते. यासाठी त्याला वारंवार धमक्या आणि त्याच्यावर हल्ले केले जात होते. या पूर्वी देखील बिश्नोई गँगने दिलेल्या धमक्यांमुळे सलमानचे कुटुंब भयभीत होते.

ट्रेंडिंग न्यूज

४६ साक्षीदारांचे जबाब आणि २२ पंचनामे

कोर्टात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रातील पुराव्यामध्ये ४६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तर सीआरपीसी कलम १६४ अन्वये दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या साक्षीदारांच्या जबाबांचा देखील यात समावेश आहे. याशिवाय, मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कबुली जबाब, एकूण २२ पंचनामे आणि तांत्रिक पुरावे देखील आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत.

मुंबई क्राइम ब्रँचने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला महाराष्ट्रात त्याला त्याचे वर्चस्व आणि दहशत निर्माण करायची होती. बिश्नोईने पैसे उकळण्यासाठी आणि त्याचे खंडणी रॅकेट पुढे नेण्याच्या उद्देशाने भीती निर्माण करण्यासाठी सलमान खानला लक्ष्य केले.

बिश्नोई विरोधात भक्कम पुरावे मुंबई पोलिसांनी गोळा केले आहेत. पोर्तुगालमधून शेअर केलेली फेसबुक पोस्ट व अनमोल बिश्नोई आणि अटक आरोपी यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग, जे फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान अनमोल बिश्नोईकडून जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांशी जुळले. ही पेसबूक पोस्ट पोर्तुगालमधील अनमोल बिश्नोईने लॉरेन्सने सांगितल्या नुसार केली होती. अटक आरोपी विकी गुप्ताच्या मोबाईलवरही ही पोस्ट सापडली.

गुन्हे शाखेला गुप्ताच्या फोनवर ३-५ मिनिटांचे रेकॉर्डिंग सापडले, जिथे तो अनमोल बिश्नोईशी बोलत होता आणि अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर शूटिंगची योजना आखण्यात आली होती.

WhatsApp channel
विभाग