Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

May 14, 2024 10:56 AM IST

Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट आली आहे, गेल्या आठवड्यात या प्रकरणी ५ व्या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज हरियाणा येथून सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आज हरियाणा येथून सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आज हरियाणा येथून सहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Salman Khan House Firing Case : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात राजस्थानमधून ५ व्या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपास पथकाला पुन्हा मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील ६ व्या आरोपीला हरियणाच्या फतेहाबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीने कोठडीत आत्महत्या केली आहे.

india iran chabahar port pact : भारत इराणमधील चाबहार करारामुळे अमेरिका संतप्त! आर्थिक निर्बंध लादण्याची दिली धमकी

हरपाल सिंग (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हरपाल सिंगने राजस्थान येथून अटक केलेला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी ह्याला त्याने आर्थिक मदत केली होती. तसेच टेहळणी करण्याच्या सूचना देखील त्याला करण्यात आल्या होत्या. हरपाल सिंगला आज विशेष मकोका न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Viral News : डुकराची किडनी लावल्याने जगप्रसिद्ध झालेल्या व्यक्तीचा मृत्यू! दोन महिन्यांपूर्वी झाली होती शस्त्रक्रिया

गेल्या महिन्यात सलमान खान याच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिशनोई गँगने हा हल्ला केल्याचे तपसात उघड झाले होते. यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. तर गेल्या आठवड्यात ७ मे रोजी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली होती. मोहम्मद रफिक चौधरी असे अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. तर चौधरीने या पूर्वी अटक करण्यात आलेल्या सागर पाल व विकी गुप्ता या दोन हल्लेखोरांना पैसे दिले होते. तसेच रेकी करण्यास देखील संगीतले होते.

१४ एप्रिलला झाला होता हल्ला

सलमान खान याच्या मुंबई येथील घरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांननी १४ एप्रिलला पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार केला होता. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हटी घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी ही तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोईने गहेळी होती. यानंतर तपसात आरोपींनी वापरलेली दुचाकी देखील पोलिसांना सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपींचे चेहरे दिसले होते तसेच त्यांची ओळख देखील निष्पन्न झाली होती. मुंबई पोलिसांनी ७२ तासांच्या आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. तर गोळीबार करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी पंजाब येथून अटक केली होती. सोनू चंदर (वय ३७), अनुज थापन (वय ३२) असे आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्याअनुज थापन याने तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर