पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई

पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई

Oct 13, 2024 12:36 PM IST

Pune Crime news : पुण्यात बोगस औषधविक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. तब्बल तीन विक्रेत्यांवर या प्रकरणी कारवाई करणीय आली आहे.

पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई

Pune Crime news : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात बनावट बनावट औषधांची विक्रीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी मोहीम हाती घेतली असून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीन औषध विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात आजार बरा करण्याच्या नावाखाली औषध विक्री केली जात आहे. या बोगस औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या औषधांचा प्रसार करण्यासाठी खोट्या जाहिराती देखील केल्या जात जातात. औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत ५३ आजारांवरील उपचाराबाबत जाहिरात करण्यास प्रतिबंध असतांना सुद्धा बनावट औषधांची विक्री केल्या जात असल्याचं उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार रुपयांची बनावट औषधं जप्त करण्यात आली आहे.

चिंचवडमधील न्यू मारुती आयुर्वेद, अमित मेडिको व बारामती येथील महालक्ष्मी आयुर्वेदिक या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. न्यू मारुती आयुर्वेद द्वारे अमृत नोनी डी प्लस या बोगस औषधाची विक्री केली जात होती. या औषधाच्या डब्बीवर मधुमेह बरा करण्याचा दावा करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासनाने या विक्रेत्यावर कारवाई करत तब्बल ३६५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तर सदाशिव पेठेतील अमित मेडिको या विक्रेत्याकडून ऑर्थोजॉइंट ऑईल या औषधाची विक्री सुरू होती. 

या औषधाच्या वेष्टनावर संधिवात बरा करण्याचा दावा करण्यात आला होता. या औषधविक्रेत्यावर देखील कारवाई करत ५ हजार ७२७ रुपयांच्या बनावट तेलाचा साथ जप्त करण्यात आला आहे. तर बारामती येथील कसबा येथील महालक्ष्मी आयुर्वेदिक या औषधलायात मूतखडा बरा करणाऱ्या भगत किडकरे या औषधाची विक्री केली जात होती. या दुकानावर देखील कारवाई करत चार हजार रुपयांचे औषध जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सहआयुक्त गिरीश हुकरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक म. बा. कवटीकवार, रजिया शेख आणि स. शि. बुगड यांनी केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर