सैफ अली खानच्या घरातच दबा धरून बसला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये नेमकं काय दिसलं? वाचा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सैफ अली खानच्या घरातच दबा धरून बसला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये नेमकं काय दिसलं? वाचा

सैफ अली खानच्या घरातच दबा धरून बसला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये नेमकं काय दिसलं? वाचा

Jan 16, 2025 01:36 PM IST

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या एका चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासले असून यात नेमकं त्यांना काय आढळलं याची चर्चा सध्या सुरू आहे. चोर आधीच घरात लपून बसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सैफ अली खानच्या घरातच लपला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं ? वाचा
सैफ अली खानच्या घरातच लपला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं ? वाचा

Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानच्या घरात चोर कसा घुसला याच उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मध्यरात्रीनंतर कोणीही इमारतीत प्रवेश केला नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. हल्लेखोर हा आधीच आपल्या घरात लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरीकरण्याच्या उद्देशाने सैफच्या घरी आला होता. सैफला जाग आली तेव्हा दोघांमध्ये हाणामारी झाली. यात चोरट्याने सैफवर चाकूने वार केले असून चोराच्या हल्ल्यात सैफ जखमी झाला.

घरात हल्लेखोर आधीच लपून बसला होता?

रात्री २.३० च्या सुमारास सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला झाला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सैफच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात मध्यरात्रीनंतर कोणीही इमारतीत प्रवेश करताना आढळले नाही. त्यामुळे हल्लेखोर आधीच सैफच्या घरात लपून बसला असावा रात्री त्याने उशिरा चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा व संधी मिळताच त्याने सैफवर हल्ला केला, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सैफ आणि चोरट्याची झाली झटापट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अभिनेता सैफ अली खानच्या घरात रात्री उशिरा चोरटा घुसला. सुरवातीला चोरट्याने घरातील नानी सैफसोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. सैफला पहाटे तीन सोबत झटापट झाली. यानंतर सैफ आला व त्याची व चोरट्याची झटापट झाली. यात त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोराचा सैफच्या घरात घुसण्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

मुंबई पोलिसांनी आजूबाजूच्या इमारती व परिसराची तपासणी स्निफर डॉगसह केली आहे. सैफच्या घरी काम करणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफची पत्नी करीना कपूर खान घटनेच्या वेळी घरी नव्हती. ती सोनम कपूर आणि रिया कपूरसोबत पार्टी करत होती. करिनाच्या इन्स्टावर एक स्क्रीनशॉटही आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफचे ऑपरेशन पहाटे साडेपाच वाजता सुरू करण्यात आले. सैफच्या शरीरात चाकूचा तुकडा सापडला आहे. त्याला अनेक जखमा झाल्या आहेत. सैफ आपले हात पाय हलवण्यास सक्षम आहे, म्हणजे पाठीचा कणा सुरक्षित आहे. आतापर्यंत सैफ व करीनाच्या टीमकडून फक्त इतकीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सध्या सैफवर उपचार सुरू आहे. पोलीस तपास करत आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर