Saif Ali Khan Attacked : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री २.३० च्या सुमारास चोर घुसून त्याने सैफवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या अंगावर ६ ठिकाणी जखमा झाल्या आहेत. सैफ अली खानच्या मानेवर, पाठीवर व हातावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे सैफ अली खान हा रियल लाईफमध्ये देखील हीरो ठरला आहे. कारण, पत्नी करीना, मुलगा तैमुर व घरच्यांना वाचवण्यासाठी सैफने थेट चोरसोबत फाईट केली. जखमी होऊन देखील सैफ मागे हटला नाही. अखेर चोरट्याला पळ काढवा लागला.
सुरक्षा व्यवस्था असतांना देखील चोर सैफच्या घरात कसा शिरला या बाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेची माहिती अशी की सैफची मुले तैमूर व जेह या दोघांच्या नॅनीला घरात शिरलेला दिसला. यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. दोघांच्या आवाजाने सैफ त्याच्या बेडरुमच्या बाहेर आला. यावेळी चोराने त्याच्या मागच्या बाजूने हातातील चाकूने त्याच्यावर केले. हा वर त्याच्या मानेला लागला. घरात करीना व लहान मुले होती. त्यामुळे सैफ अली खानने चोराचा प्रतिकार केला. दोघांमध्ये मोठी झटापट झाली. सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्याच्यावर आणखी वार केले. त्याच्या हातावर व शरीराच्या इतर भागावर वार केल्याने सैफ गंभीर जखमी झाला. दरम्यान, घरच्यांनी देखील आरडा ओरडा केला. यामुळे चोरट्याने सैफला धक्का देऊन घरातून पळ काढला. सैफ जखमी झाल्याने त्याच्या शरीरातून रक्त वाहात होते. या घटनेनंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच या प्रकरणी वांद्रे पोलिसांना देखील तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पाहणी केली. तसेच सीसीटीव्हीची तपासणी करून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने देखील या घटनेचा तपास सुरू केला आहे. सध्या सैफच्या घरातून तिघा नोकरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सैफ अली खान हा वांद्रे येथील सद्गुरु शरण येथील इमारतीत राहतो. सैफ अली खान या सोसायटीत १२ व्या मजल्यावर राहतो. मुंबई पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले. लॉबी व सैफ राहत असलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही देखील तपासन्यात येत आहे. मात्र, यात कोणताही व्यक्ती दिसत नसल्याचे आढळून आहे. दरम्यान चोरहा इमारतीच्या एसी किंवा इलेक्ट्रिक डक्टमधून वर आला का याची देखील पोलिस पाहणी करत आहेत.
संबंधित बातम्या