Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करून तब्बल तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा हल्लेखोर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तीन दिवस जंगजंग पछाडलं. आरोपी हा अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आणि अखेर त्याला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. सैफवर हल्ला केल्यावर हल्लेखोर कुठे कुठे गेला, कुठे लपून बसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? याचा धक्कादायक घटनाक्रम त्याच्या चौकशीतून समोर आला आहे.
सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, मुंबई पोलिस शहजादपर्यंत कसे पोहोचले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर शहजादने केलेला यूपीआय व्यवहार मुंबई पोलिसांसाठी महत्त्वाचा सुगावा ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी शहजादच्या यूपीआय व्यवहारातून त्याचा मोबाइल नंबर काढला. व त्याचा नंबर ट्रेस केले. आरोपीचे लोकेशन कळताच १०० पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे. यात त्याने अनेक बाबी सांगितल्या आहेत. जेव्हा आरोपीचा ठावठिकाणा सापडला तेव्हा मुंबई पोलिसांच्या १०० जणांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी कोठे गेला याच थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. दरम्यान, घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीत लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांची पथकाने या ठिकाणी त्याचा शोध घेतला. परंतु तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा तो कांदळवन जंगल परिसरात लपून असल्याचं दिसलं. याच वेळी हल्लेखोराने मोबाईल सुरू केला. त्यामुळे त्याचं ठिकाण पोलिसांना समजलं. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
प्राथमिक चौकशीत आरोपीनं सांगितले की, टीव्ही आणि युट्युबवर त्यांने त्याचे फोटो पाहिल्यावर तो घाबरला. यानंतर तो ठाण्यात पळून गेला. ठाण्यातील एका बारमध्ये तो काम करत असून या परिसराची त्याला चांगली माहिती असल्याचे त्याने सांगितले.
वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी आरोपीचा शोध घेतल्यानंतर संशयिताचा त्याच्या त्याच परिसरात शोध सुरू करण्यात केला. तपासादरम्यान आरोपीने दादर स्थानकाबाहेर रोख रक्कम देऊन मोबाइल कव्हर खरेदी केले होते. त्यानंतर कबुतरखानामार्गे वरळीला गेल्याचे पोलिसांना सीसीटीव्हीत आढळले. पोलिसांनी वरळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर दिसला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा स्टॉल मालकाशी दोनदा बोलताना दिसला. गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीला आरोपीबाबत विचारपूस केली. चहाची टपरी चालवणारी व्यक्ती नवीन एक्का कोळीवाड्याजवळ राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा एक्काचा मित्र असल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांच्या सात पथकांनी शनिवारी वरळी-कोळीवाडा परिसरात शोध घेऊन आरोपींची छायाचित्रे विक्रेत्यांना दाखवली. तपासादरम्यान एक्का हा जनता कॉलनीतील जयहिंद मित्र मंडळाच्या घरात इतर चार-पाच कामगारांसह राहत असल्याचे निष्पन्न झाले. पण पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराला कुलूप होते. यानंतर पोलिसांनी घरमालक राजनारायण प्रजापती यांच्याशी संपर्क साधला. प्रजापती यांचा मुलगा विनोद यांच्यामार्फत पोलिसांना एक्काचा मोबाईल नंबर मिळाला. पोलिसांनी विनोदला संशयिताचा फोटो दाखवला. विनोदने पोलिसांना सांगितले की, आरोपीने यूपीआयद्वारे पराठा आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे दिले होते.
आरोपीने ‘जी’ पेच्या माध्यमातून पैसे दिल्याने पोलिसांना आरोपीचा मोबाइल नंबर मिळाला. ठाण्यातील कासारवडवली येथील मजूर छावणी आणि काही महिन्यांपूर्वी आरोपींना कामावर ठेवणाऱ्या अमित पांडे नावाच्या कंत्राटदाराकडे पोलिसांनी चौकशी केली. यूपीआयच्या मध्यमातून पोलिसांना मिळालेला मोबाइल नंबर हा तपासाचा टर्निंग पॉईंट ठरला. सुमारे २० पथके घटनास्थळी दाखल झाली आणि संशयिताचा शोध सुरू केला. परंतु आरोपी, पोलिस येण्यापूर्वीच घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाइल देखील बंद केला होता. आरोपींचा शोध घेत असताना पोलिस छावणीजवळील खारफुटीच्या जंगलात पोलिस गेले असता डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील एका पोलिसाला आरोपी दिसला.
संबंधित बातम्या