मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

Jan 19, 2025 06:54 AM IST

Saif Ali Khan attacker arrested : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मजूर छावणीतून आरोपीला अटक केली.

मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक
मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

Saif Ali Khan attacker arrested : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.  मोहम्मद आलियान ऊर्फ बी.जे. असे हल्लेखोराचे नाव आहे. विजय दास असे नाव बदलून तो मुंबईत राहत होता. त्याने सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तो   मुंबईतील एका पबमध्ये काम करत होता. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील मेट्रो बांधकाम साइटजवळील कामगार छावणीतून त्याला अटक करण्यात आली. विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही अटक केली.  झोन-६चे डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आणि कासारवडवली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.

बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय 

आरोपी हा बांग्लादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मोहम्मद आलियानला वांद्रे येथे आणून त्याची चौकशी सुरू केली आहे. आज सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हल्लेखोर भारतीय आहे की बनावट ओळखपत्रासह भारतात राहणारा बांगलादेशी नागरिक आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत. हल्लेखोराला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्रांचे पोस्टर लावले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर पायऱ्या उतरताना दिसत आहे. 

छत्तीसगड मधून आणखी एका संशयतीला अटक 

दादर रेल्वे स्थानकातील अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि क्लिप पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी दासला अटक करण्यासाठी एक पथक तयार केले होते. छत्तीसगडमधील दुर्ग मध्ये या प्रकरणाशी संबंधित आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक दुर्ग येथे दाखल झाले असून आकाश कैलास कनोजिया असे संशयिताचे नाव आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये चढत असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संशयिताला पकडले. मुंबई पोलिसांनी आरपीएफला संशयिताचा फोटो आणि लोकेशनची माहिती दिली होती.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी मध्य प्रदेशात शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर अधिकाऱ्यांनी ही अटक आणखी वेगळ्या  प्रकरणात झाल्याचे सांगितले. सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरी घुसून एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा काढला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत घुसला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर