स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम

स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम

Jan 18, 2025 08:58 AM IST

Saif Ali Khan Attack News : सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेण्यात आले. रिक्षात बसलेला सैफने नेमकं काय म्हटलं व त्या रात्री काय झालं याचा घटनाक्रम रिक्षाचालकानं सांगितला आहे.

स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! हल्ल्याच्या रात्री नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! हल्ल्याच्या रात्री नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Saif Ali Khan Attack News : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसह देश  हादरला आहे. सध्या सैफ रुग्णालयात असून त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. सैफला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं. ज्या रिक्षातून त्याला नेण्यात आलं त्या रिक्षाचालकानं त्या रात्री नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. सैफ जेव्हा ऑटोमध्ये बसला होता. घरापासून हॉस्पिटलपर्यंतचे नेमकं काय काय झालं हा सर्व घटनाक्रम रिक्षा चालकाने सांगितलला आहे. सैफचा मुलगा इब्राहिमने आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेलं. 

अभिनेता असल्याचं समजलं नाही 

रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की, “सैफ अली खानच्या मानेला व पाठीला गंभीर जखमा झाल्या होत्या.  जेव्हा सैफ रिक्षात आला तेव्हा तो खरचं  सैफ अली खान असल्यावर विश्वास बसला नाही. मला वाटलं की  कोणीतरी हा सामान्य व्यक्ती असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्या मानेला आणि पाठीवर अनेक जखमा होत्या. आम्ही त्याला तातडीने दवाखान्यात नेले. आमची रिक्षा दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने गेटवर थांबवली. यावेळी वेदनेने विव्हळनाऱ्या सैफने मी सैफ अली खान आहे, लवकर स्ट्रेचर घेऊन या म्हणाला. यावेळी हॉस्पिटलचे काही कर्मचारी देखील त्या ठिकाणी आले.  त्यांनी तातडीने  सैफच्या कंबरेला व  खांद्याला पकडून दवाखान्यात  नेलं. सैफ स्वत: चालत चालत रिक्षामध्ये येवून बसला होता. त्यांच्यासोबत त्याचा मुलगा  इब्राहिम देखील रिक्षात होता, सैफ यांचा आणखी एक लहान मुलगा आणि आणखी एक व्यक्ती होता.  रिक्षात बसल्यावर सैफ म्हणाला दवाखान्यात जायला  किती वेळ लागेल? यानंतर त्याने पुढे किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'मी जात होतो आणि तेवढ्यात गेटमधून मला आवाज ऐकू आला. आम्ही ८-१० मिनिटात दवाखान्यात पोहोचलो.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव 

सैफच्या मानेला व  पाठीला गंभीर जखमा होत्या. त्यातून खूप मोठा रक्तस्त्राव होत होता.  रक्त इतकं वाहत होतं की त्याचा पांढरा कुर्ता लाल रंगाचा झाला होता. रिक्षा चालक म्हणाला, "मी पैसेही घेतले नाहीत. मी त्याला वेळेवर दवाखान्यात घेऊन आलो याचा मला आनंद झाला. जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा त्याने (सैफ) गेटवर उभ्या असलेल्या गार्डला फोन केला आणि स्ट्रेचर आणण्यास सांगितले.  

सैफवर सहा वार करण्यात आले आणि चाकूचा एक तुकडा  त्याच्या मणक्यात अडकून पडला होता.  जो शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी काढून टाकला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सैफ जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याची अवस्था खूप बिकट होती. तो खूप नशीबवान होता. चाकू थोडा खोल असता तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. तो रिअल लाईफ हिरो असल्याचं देखील डॉक्टर म्हणाले. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर