Saif Ali Khan Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून आता त्याच्याशी संबंधित एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. या महिलेला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. सोमवारी पोलिसांनी या महिलेची चौकशी देखील केली आहे. सैफवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शरीफुल इस्लामयाने वापरलेले सिमकार्ड या महिलेच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे.
ज्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे, ती पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. या महिलेची चौकशी करण्यासाठी पोलिस छपरा आणि नादियामधील झिटकाफोटा येथील बराह अंदुलिया गावात पोहोचले. येथून या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी कोलकात्याच्या प्रवासादरम्यान तिचा मोबाइल हरवला होता.
कृष्णानगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (मुख्यालय) मकवाना मीतकुमार संजयकुमार यांनी सांगितले की, या हल्ल्याप्रकरणी नादियामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, महिलेने आरोपीची ओळख पटविण्यास नकार दिला. काही वर्षांपूर्वी कोलकात्यात असताना तिचा मोबाइल हरवला होता, असा दावा या महिलेने केला आहे. आरोपीने महिलेच्या नावे सिमकार्ड कसे रजिस्टर केले, याचा तपास पोलिस करत आहेत.
खुखुमोनी जहांगीर शेख असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अंदुलिया येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर ही महिला बारा अंदुलिया येथील घर सोडून छपरा येथे राहू लागली होती. त्याच वेळी तिने दुसरे लग्न केले. गाव बदलताना तिने मोबाईल फोन आणि सिमकार्ड सोबत ठेवले होते.
पीडित मुलीच्या वडिलांनी एका वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले की, "ती छपरा येथे राहते, परंतु नुकतीच ती झिटकाफोटा भागात एका नातेवाईकाकडे राहत होती. सकाळी स्थानिक पोलिसांसह मुंबई पोलिसांचे पथक आले. त्यांनी काही तास त्याची चौकशी केली आणि निघून गेले. सायंकाळी पथकाने घरी येऊन तिला ताब्यात घेत तिची चौकशी केली.
संबंधित बातम्या