Pune khadakwaslaa Vidhansabha Election : पुणे जिल्ह्यात अनेक महत्वाच्या लढती झाल्या. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून होते ते खडकवासला मतदारसंघाकडे. या मतदारसंघात परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. माजी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयूरेश वांजळे, सचिन दोडके, व भाजपचे भीमराव तापकिर यांच्यात तिहेरी लढत झाली. या लढतीत मयूरेश वांजळे यांच्या उमेदवारीचा फटका तुतारीला बसला. यामुळे खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांच्या विजयाने कमळ फुलले. गेल्यावेळी सचिन दोडके यांचा २५०० मतांनी निसटता पराभव झाला होता. तयार यावेळी भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके यांचा तब्बल ५२ हजार ३२२ मताधिक्याने दुसऱ्यांदा पराभव केला.
खडकवासला मतदारसंघामध्ये एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. मात्र, या ठिकाणी खरी लढत ही तिरंगी झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्यात प्रामुख्याने लढत झाली. तापकीर यांना या निवडणुकीत ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे खडकवासला मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे.
२००९मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदार संघातून मनसेचे रमेश वांजळे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तेव्हापासून सलग तीनवेळा भीमराव तापकीर निवडून आले आहेत. भीमराव तापकीर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २५०० मतांनी विजय झाला होता. त्यामुळे २०१४ निवडणुकीत त्यांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, २३ तारखेला मतमोजणी सुरू होताच भीमराव तापकिर यांनी मतांची आघाडी कायम ठेवत सचिन दोडके यांचा पराभव केला. या वर्षी यंदा खडकवासला मतदारसंघात ५६.५३ टक्के मतदान झाले होते.
या वर्षी भीमराव तापकीर यांचे नावे भाजपच्या दुसऱ्या यादीत घोषित करण्यात आले. त्यामुळे ते विजयी होतील की नाही या बद्दल सर्वांना शंका होती. त्यात मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. असे असतांना या ठिकाणी मनसेकडून मयुरेश वांजळे यांना उभे करण्यात आले. सचिन दोडके व मयूरेश वांजळ्ए यांची भावकी असून वांजळे यांच्या उमेदवारीचा सचिन दोडके यांच्या मतांवर परिमाण झाला. त्यांची मते विभागली गेली. या निवडणुकीत मयुरेश वांजळे यांना ४२,८९७ इतकी मते मिळाली. याचा फायदा हा तापकीर यांना झाला. तसेच दोडके यांचा अपप्रचार करण्यात तापकीर यशस्वी ठरले. त्यामुळे देखील दोडके यांना फटका बसला व त्यांचा मोठ्या मताधिकयाने पराभव झाला. या निवडणुकीत भीमराव तापकीर १,६३,१३१ मते मिळाली, सचिन दोडके यांना १,१०,८०९ मते मिळाली तर मयुरेश वांजळे यांना ४२,८९७ मते मिळाली.