ruia college news : वर्ग सुरू असताना विद्यार्थिनीच्या अंगावर पडला पंखा; रुईया कॉलेजमधील धक्कादायक घटना-ruia college student injured after ceiling fan falls on her arm ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ruia college news : वर्ग सुरू असताना विद्यार्थिनीच्या अंगावर पडला पंखा; रुईया कॉलेजमधील धक्कादायक घटना

ruia college news : वर्ग सुरू असताना विद्यार्थिनीच्या अंगावर पडला पंखा; रुईया कॉलेजमधील धक्कादायक घटना

Aug 09, 2024 09:56 AM IST

ruia college news : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या रुईया कॉलेजमध्ये वर्ग सुरू असतांना अचानक पंखा पडल्याने एक विद्यार्थीनी जखमी झाली आहे.

भर वर्गात क्लाससुरू असतांना विद्यार्थीनीच्या अंगावर पडला पंखा; रुईया कॉलेजमधील धक्कादायक घटना
भर वर्गात क्लाससुरू असतांना विद्यार्थीनीच्या अंगावर पडला पंखा; रुईया कॉलेजमधील धक्कादायक घटना

ruia college news : मुंबईतील माटुंगा येथील राम नारायण रुईया महाविद्यालयात बुधवारी सकाळी वर्ग सुरू असतांना धक्कादायक घटना घडली. अचानक छतावरील पंखा कोसळून विद्यार्थीनीच्या हातावर पडला. या घटनेत ही विद्यार्थीनी थोडक्यात बाचावली असून तिच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. मात्र, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बुधवारी सकाळी रुईया महाविद्यालयात एमए फिलॉसॉफीचा वर्ग सुरू होता. यावेळी ही घटना घडली. सध्या महाविद्यालयात नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अनन्या घाग असे या घटनेत जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटणेबाबत जखमी विद्यार्थिनी अनन्याचे वडील सतीश घाग म्हणाले, "माझी मुलगी नशीबवान होती कारण ती थोडक्यात बाचावली. पंखा खाली पडून देखील वर्गातील शिक्षकांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. फॅन बाजूला करून वर्ग पुन्हा सुरू करण्यात आला.

या घटनेची दखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील केली आहे. शिवसेनेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शशिकांत ढोरे यांनी कॉलेजला भेट देऊन कॉलेजच्या पायाभूत सुविधांची तपासणी करण्याची मागणी केली.

त्यांनी मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून या पत्रात, युवा सेनेने भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची हमी देण्याची मागणी केली आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुश्री लोकूर यांनी या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "आम्ही नियमितपणे वर्गातील पायाभूत सुविधांची तपासणी करतो. या घटनेनंतर, सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व जुने ते पंखे बदलण्याचा निर्णय घेतला आहे."

सायबर चोरट्यांकडून सहा जणांची ८० लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रोज विविध फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. चोरट्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून सहा जणांची तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विमानतळ, कोंढवा, कोथरुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीची शेअर बाजारात गुंतवणूक मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने ३० लाख रुपयांची फसवून करण्यात आली आहे. तर तर आमिषाने एकाची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तर इतर दोन घटनांमध्ये देखील याच प्रकारची फसवणूक करण्यात आली आहे.

विभाग