हत्या झालेल्या RTI कार्यकर्त्याच्या मांडीवर गोंदलेली होती शत्रूंची नावं; पोस्टमॉर्टेम करताना डॉक्टरही हैराण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हत्या झालेल्या RTI कार्यकर्त्याच्या मांडीवर गोंदलेली होती शत्रूंची नावं; पोस्टमॉर्टेम करताना डॉक्टरही हैराण

हत्या झालेल्या RTI कार्यकर्त्याच्या मांडीवर गोंदलेली होती शत्रूंची नावं; पोस्टमॉर्टेम करताना डॉक्टरही हैराण

Updated Jul 27, 2024 05:33 PM IST

Mumbai Crime : मुंबईत आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. मात्र, हत्येपूर्वी त्यानं त्याला त्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे मांडीवर गोंदवली होती. शवविच्छेदन करतांना डॉक्टरांनी ही नावे पहिल्यावर ते देखील हैराण राहिले.

आरटीआय कार्यकर्त्यानं हत्येपूर्वी मांडीवर गोंदवले होते दुश्मनांची नावं; पोस्टमोर्टम करतांना डॉक्टरी हैराण; आरोपी गजाआड
आरटीआय कार्यकर्त्यानं हत्येपूर्वी मांडीवर गोंदवले होते दुश्मनांची नावं; पोस्टमोर्टम करतांना डॉक्टरी हैराण; आरोपी गजाआड

Mumbai Crime : मुंबईत वरळी येथे एका आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या मांडीवर संशयित हल्लेखोरांची नावे गोंदवली होती. शवविच्छेदनानंतर ही नावे दिसल्यावर डॉक्टर देखील हैराण झाले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्या आधारावर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई येथे आरटीआय कार्यकर्ते गुरु वाघमारे (वय ५२) यांची एका 'स्पा'मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्पा मालक आणि राजस्थानमधील कोटा येथील तीन जणांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, गुरु वाघमारे यांनी मृत्यूपूर्वी तब्बल २२ लोकांची नावे गोंदवली होती. हे सर्वजण आपली हत्या करतील, अशी त्यांना भीती होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान वाघामरे यांनी मांडीवर गोंदवलेली नावे ही डॉक्टरांना दिसली. याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. यानंतर ज्या स्पामध्ये वाघमारे यांची हत्या झाली, त्या मालकालाही वरळी पोलिसांनी अटक केली आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज अन्सारी (वय २६) आणि राजस्थानमधील कोटा येथून साकिब अन्सारी याला अन्य दोन संशयितांसह अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, " वाघमारे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली आहे. स्पा मालकाने ही सुपारी आरोपींना दिली होती. गुरु वाघमारे हे विलेपार्ले येथे राहत होते. ते वरळी नाका येथील स्पामध्ये नियमितपणे जात होते. या ठिकाणी काम करणाऱ्यांसोबत त्यांची ओळख होती.

वाघमारे हे मंगळवारी संध्याकाळी स्पामध्ये गेले असता, तेथे त्यांची मैत्रीण व तीन पुरुष मित्रांनी त्यांना वाढदिवसाची पार्टी करू असे सांगीतले. हे पाच जण सायनमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास ते सर्वजण स्पामध्ये परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले, तर वाघमारे व त्यांची मैत्रीण तेथेच थांबली होती.

सुमारे दोन तासांनंतर हल्लेखोर हे स्पामध्ये घुसले. त्यांनी वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याची हत्या केली. रात्री अडीचच्या सुमारास या घटनेची माहिती वरळी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर