‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य

‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य

Dec 20, 2024 08:37 AM IST

Mohan Bhagwat On Ram Mandir : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर आणि हिंदू धर्माबाबत मोठं विधान केलं आहे.

‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य
‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य (ANI)

Mohan Bhagwat On Ram Mandir : '‘‘धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती होते आहे, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाजपचे कान टोचले. या सोबतच भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही,’ असेही भागवत म्हणाले.

पुण्यात गुरुवारी सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. भागवत यांचे ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. मोहन भागवत हे गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या मंदिर-मशिदीच्या वादावरून नाराज होते. राम मंदिरासारखा मुद्दा इतरत्र उपस्थित करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

भागवत म्हणाले, "देशात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सामंजस्याने राहत आहोत. ही सदिच्छा जगापर्यंत पोहोचवायची असेल तर एक मॉडेल तयार करावे लागेल. राम मंदिराच्या उभारणीनंतर नवीन ठिकाणी असेच मुद्दे उपस्थित करून ते हिंदू नेते होतील, असे काही लोकांना वाटते. हे मान्य नाही. ते म्हणाले की, राम मंदिराची निर्मिती झाली कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. भारतीय प्राचीन, सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे. हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तो आजही दडविला जात आहे. देशाची परंपरा शाश्वत आहे. आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे असलो तरी, आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत. मात्र, स्वतंत्र देशात राहायचे असताना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी,’ असा सवाल भागवत यांनी केली. अयोध्येतील राम मंदिर हिंदूंना द्यावे, असे ठरले होते, पण इंग्रजांना त्याची हवा मिळाली आणि त्यांनी दोन्ही समाजात दुरावा निर्माण केला. तेव्हापासून फुटीरतावादाची भावना अस्तित्वात आली. परिणामी पाकिस्तान अस्तित्वात आला.

प्रत्येकजण स्वत:ला भारतीय समजत असेल तर वर्चस्ववादाची भाषा का वापरली जात आहे, असा सवाल भागवत यांनी केला. कोण अल्पसंख्याक आणि कोण बहुसंख्याक? इथे सगळे समान आहेत. प्रत्येकजण आपापल्या उपासना पद्धतीचे अनुसरण करू शकतो, ही या देशाची परंपरा आहे. गरज फक्त चांगल्या भावनेने जगण्याची आणि नियम-कायदे पाळण्याची आहे, असे देखील भागवत म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर