मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “हिंमत असेल तर..”, रामदास आठवलेंचे नाना पटोलेंना खुलं आव्हान

“हिंमत असेल तर..”, रामदास आठवलेंचे नाना पटोलेंना खुलं आव्हान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 08, 2022 10:25 PM IST

आरपीआय नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी पटोलेंना हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडून दाखवा, असं आव्हान दिलं आहे.

आठवलेंचे नाना पटोलेंना खुलं आव्हान
आठवलेंचे नाना पटोलेंना खुलं आव्हान

बीड – भाजप नेत्यांकडून वारंवार राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे केले जातात. त्यानंतर आता आरपीआय नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी पटोलेंना हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडून दाखवा, असं आव्हान दिलं आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावून तिथे सत्ता स्थापन केली होती. पण राष्ट्रवादीच्या तिथल्या स्थानिक राजकारणावरुन नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीत काहीसा तणाव निर्माण झाला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आता रामदास आठवलेंनी नाना पटोलेंना चॅलेंज दिलंय. नाना पटोलेंनी हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडून दाखवावं, असं चॅलेंज त्यांनी दिलंय. यावर नाना पटोले काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

रामदास आठवले म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांतचार राज्यात आमचं सरकार आलं आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. काँग्रेसचे नाना पटोले म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. मात्र तुम्ही एवढे खंजीर खुपसून रक्तबंबाळ झालेले असताना तुम्ही तिथे सरकारमध्ये आहात. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर सरकारचा पाठिंबा काढावा",असं आव्हान रामदास आठवलेंनी दिलं.

आठवले म्हणाले की,सबका साथ सबका विकास, ही भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना मोदींनी भाजपमधून काढून टाकलं आहे. त्यामुळे२०२४च्या निवडणुकीत आम्हीच असणार आहोत. मोदींचा सामना कोणीही करू शकत नाही.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या