मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athvle : तर मुंबई पालिकेत ‘आरपीआय’चा महापौर होईल; रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Ramdas Athvle : तर मुंबई पालिकेत ‘आरपीआय’चा महापौर होईल; रामदास आठवले

06 September 2022, 15:34 ISTNinad Vijayrao Deshmukh

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आले असून आता पुणे महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई पालिकेतही आम्हाला महापौर किंवा उपमहापौरपद द्यावे, अशी मागणी मत केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.

पुणे : राज्यात अखेर महायुतीचे खरे सरकार आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्री पद आणि १२ विधान परिषदेच्या जागेत स्थान मिळावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. या खऱ्या युतीचा विजय मुंबई मनपा निवडणुकीत बहुमताने युतीचा विजयी होईल. भाजप आणि शिंदे गटाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे. मुंबईमध्ये आम्हास पुण्याप्रमाने उपमहापौर पद मिळावे आणि जर आरक्षण पडले तर महापौर पद मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केली. या सोबतच शिवसेनेची अवस्था आरपीआय सारखी झाली आहे. शेकडो गटांमुळे आमच्या समाजाची अवस्था क्षीण झाली आहे. आमचा सर्वात प्रभावशाली गट असून ही आमदार, खासदार निवडून आणण्याची ताकद अद्याप आमच्यात नाही, अशी खंतही आठवले यांनी व्यक्त केली.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट सरचिटणीस पांडुरंग सरोदे खजिनदार अभिजीत बारबाई व्यासपीठावर उपस्थित होते. रामदास आठवले म्हणाले, पहिला महापौर आमचा चंद्रकांत हांडोरे मुंबईत काँग्रेस सोबत युतीत असताना झाला होता. अनेक ठिकाणी आम्हास भरभरून यश मिळेल. आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने लोक आनंदात आहे, युतीचे सरकार पडणार आहे आणि अडीच वर्ष सरकार टिकेल. त्याचसोबत पुढील पाच वर्ष ही आम्ही सत्तेत येऊ असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

आठवले म्हणाले, पत्रकारांमुळे आमच्यासारखे सामान्य लोक दिल्ली पर्यंत पोहचलो आहे. त्यांनी आमचे फोटो, बातम्या दिल्या नसत्या तर आम्ही मोठे झालो नसतो. देशभरात आमची ओळख पत्रकारांमुळे निर्माण झाली आहे त्यामुळे पत्रकार यांना संरक्षण दिले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. पत्रकारांनी विरोधात बातमी दिली की त्यांच्यावर हल्ला होणे चुकीचे आहे. पत्रकारांना हल्ला विरोधात संरक्षण मिळाले पाहिजे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही आग्रह करू.

आमचा प्रयत्न असा आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सर्व समाज घटक आम्ही पक्षात सामील करत आहे. सध्या भटक्या विमुक्त समाज हा ओबीसी मध्ये आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवर यापुढे प्रयत्न करणार आहे. त्यांना वेगळे आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे त्याबाबत विधाते कमिशन ची शिफारस आहे. त्याबाबत आम्ही विचार करत असून लवकरच याबाबत निर्णय होईल.

उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळेच शिवसेनेत फुट

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ज्यांनी सेना वाढविण्यास आयुष्भर काम केले त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे. मोठी आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. ते सातत्याने चांगले काम करत असून त्यांचा कामाचा व्याप वाढत असल्याने उद्धव ठाकरे सध्या कुठे दिसत नाही. शिंदे यांच्यासह इतर १६ आमदारांना न्यायालयात दिलासा मिळेल. बाहेरील व्हीपला काही अर्थ नाही.

विभाग