मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

May 21, 2024 12:43 PM IST

Fake Voting Viral Video: लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बोगस मतदानाच्या घटना उघडकीस आल्या.

बोगस मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बोगस मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HT)

Lok Sabha Election 2024: लोकशाही निवडणुकीसाठी देशात सोमवारी (२० मे २०२१) पाचव्या टप्प्यासाठी मतदान झाले. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात बोगस मतदानाच्या घटना उघडकीस आल्या. सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुण ८ वेळा मतदान केल्याचे दावा करत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. एक व्यक्ती आठ वेळा कसे मतदान करू शकतो? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.या व्हिडिओमागील सत्य तपासले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या एटा येथील असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण ८ वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली.यानंतर निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस केली. तसेच पोलिंग पार्टीच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आले. या व्यक्तीने स्वत: आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. प्रत्येक वेळी मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रायबरेली, अमेठी आणि राजधानी लखनौसह उत्तर प्रदेशातील १४ जागांसाठी सोमवारी (२० मे २०२४) रोजी मतदान झाले. सार्वत्रिक निवडणुकीच्या या टप्प्यात ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ४९ जागांवर मतदानाचा हक्क बजावला. रायबरेली,अमेठी आणि लखनौ व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज, हमीरपूर, जालौन, झाशी, बांदा, फतेहपूर, कौशांभी, फैजाबाद, बाराबंकी, कैसरगंज आणि गोंडा या मतदारसंघांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश भाजपसाठी महत्त्वाचा

एनडीएच्या ४०० जागांच्या लक्ष्यासाठी उत्तर प्रदेश भाजपसाठी महत्त्वाचा आहे. २०१९ मध्ये भाजपने ६२ आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७१ जागा जिंकल्या. काँग्रेस उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सहाव्या टप्प्यात १४ जागांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित १३ जागांसाठी शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रेदशमधून ८० खासदार लोकसभेत जातात.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग