Rohit Sharma Mumbai Airport Video: २०२४ च्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित शर्मा श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून मैदानात पुनरागमन करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला येत्या २ ऑगस्टपासून सुरुवात होईल. यापूर्वी रोहित शर्माचा मुंबईतील विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासाठी स्वत: कार चालवताना दिसत आहे.
व्हिडिओत दिसत आहे की, रोहितची लॅम्बोर्गिनी कार विमानतळावर त्याची वाट पाहत होती. रोहितलाही सर्व बाजूंनी चाहत्यांनी घेरले. कसा तरी स्वतःला सावरल्यानंतर रोहित त्याच्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि पत्नी आणि मुलीसह निघून गेला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. या मालिकेत रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी असेल.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ केवळ सहा एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय संघाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. अष्टपैलू रियान पराग आणि अनकॅप्ड वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांचा भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला. आयपीएलच्या गेल्या हंगामात या दोन्ही खेळाडूंनी दमदार करून दाखवली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्यांच्याकडून अशीच कामगिरीची अपेक्षा आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मो. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
संबंधित बातम्या