मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : अजित पवारांमध्ये तेवढी हिंमत आहे का?; रोहित पवार यांचा थेट सवाल

Rohit Pawar : अजित पवारांमध्ये तेवढी हिंमत आहे का?; रोहित पवार यांचा थेट सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 09, 2024 03:21 PM IST

Rohit Pawar befitting Reply to Ajit Pawar : शरद पवार यांच्या वयावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या अजित पवार यांना आमदार रोहित पवार यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar Vs Rohit Pawar
Ajit Pawar Vs Rohit Pawar

Rohit Pawar dares Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व मूळ पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक चकमकी सुरू आहेत. प्रत्येक सभेत पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या वयाबद्दल बोलणाऱ्या अजित पवार यांना आमदार रोहित पवार यांनी प्रथमच सुनावलं आहे. ‘जे आमच्या नेत्यांबद्दल बोलता, ते नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची हिंमत तुमच्यात आहे का,’ असा थेट सवाल रोहित यांनी अजित पवारांना केला आहे.

एका पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी रोहित पवार यांचा बच्चा असा उल्लेख केला होता. तसंच, एक जाहीर सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संयमी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, रोहित पवार यांनी आज कर्जत इथं पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्याबद्दल प्रथमच आक्रमक भाषा वापरली आहे.

Sharad Pawar : प्रभू राम मांसाहारी होते?; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार काय म्हणाले पाहा!

लहान मुलं मनानं स्वच्छ असतात!

'अजित पवार हे मला बच्चा समजतात याचं मला काही वाटत नाही. शेवटी ते मोठे नेते आहेत आणि त्यांना मी बच्चा वाटणारच. मी बच्चा आहेच. शेवटी ते माझे काका आहेत. पण लहान मुलं ही मनानं स्वच्छ असतात असं म्हणतात. मी तसाच आहे असं मला म्हणावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

‘अजित पवार जेव्हा आमच्याबद्दल किंवा इतर युवा आमदारांबद्दल बोलतात, तेव्हा आम्हाला बच्चा म्हणतात. दुसरीकडं शरद पवार साहेबांचं वय झालं, असं म्हणतात. मग काही वर्षांनंतर, तीन-चार वर्षांतर मोदी हे ऐंशी वर्षांचे होतील तेव्हा तुम्ही त्यांना हाच प्रश्न करणार का? तुम्ही ऐंशी वर्षांचे झालात, आता राजकारणातून बाजूला व्हा, असं त्यांना म्हणणार का? एवढी हिंमत तुमच्यात आहे का?,’ असा रोकडा सवाल त्यांनी अजित पवारांना केला.

‘एका बाजूला ते आमच्या नेत्यांबद्दल बोलतात, पण इतरांबद्दल ते काहीच बोलणार नाही का? खरंतर वय हा विषय नसतो. उद्या कधी-ना-कधी मोदींना देखील वयाचा प्रश्न करावा लागेल. प्रश्न हा आहे की ती हिंमत तुमच्यात आहे का आणि तुम्ही ते विचारणार आहात का,’ असा बोचरा टोला रोहित पवार यांनी हाणला.

WhatsApp channel