मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धाडी टाकल्या म्हणून मी भाजपसोबत येईन असं त्यांना वाटत असेल, पण... रोहित पवार काय बोलले?

धाडी टाकल्या म्हणून मी भाजपसोबत येईन असं त्यांना वाटत असेल, पण... रोहित पवार काय बोलले?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 06, 2024 06:27 PM IST

Rohit Pawar on Baramati Agro Raid : बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडवर ईडीनं टाकलेल्या धाडीवर आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सूचक आणि खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar reaction on ED Raid : बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड या कंपनीवर सक्तवसुली संचानलयानं टाकलेल्या छाप्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘धाडी टाकल्या, चौकशी लावली म्हणून मी भाजपसोबत जाईन असं त्यांना वाटत असेल पण तसं होणार नाही,’ असं रोहित पवार यांनी ठणकावलं आहे.

ते एएनआयशी बोलत होते. ‘ईडीचे अधिकारी चौकशीचं काम करत आहे. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. अधिकाऱ्यांचा यात काही संंबंध नसतो. त्यांना सांगितलेलं काम ते करत असतात. मात्र राजकारणाचं म्हणाल तर त्यामागे कोण आहे हे कालांतरानं समोर येईलच,’ असं रोहित पवार म्हणाले.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी मीच अधिक योग्य; सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बेधडक बोलल्या

फडणवीसांची वक्तव्ये विश्वास ठेवण्यासारखी नसतात!

रोहित पवार हे विनाकारण ईडीच्या छाप्यांचा बाऊ करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं. 'फडणवीसांच्या वक्तव्ये विश्वास ठेवण्यासारखी नसतात. ती अशी व्यक्ती आहे की जी आज एक बोलते आणि दुसऱ्या दिवशी नेमकं उलटं बोलते, असं रोहित पवार म्हणाले.

'मी राजकारण करतोय असं ते म्हणतात. पण वस्तुस्थिती काय आहे? मी या प्रकरणावर कुठली प्रतिक्रिया सुद्धा दिली नव्हती. मी परदेशात होतो. छाप्यांविषयी कळताच मी कालच तिथून निघालो. मी तिथलं वास्तव्य लांबवलंही नाही. कारण, मी कुठल्याही चौकशीला अजिबात घाबरलेलो नाही. कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाहीय, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

नाटकांतून इतिहासाचा विपर्यास होऊ नये; 'या' नाटकाचा उल्लेख करत शरद पवारांचं आवाहन

अजित पवार, छगन भुजबळांना हाणला टोला

‘मागच्या पाच वर्षांतील फडणवीसांची विधानं बघा. ते अजित पवारांच्या विरोधात बोलले, भुजबळांच्या विरोधात बोलले. इतर अनेक नेत्यांच्या विरोधात बोलले. ते सर्व नेते आता भाजपसोबत गेले. त्यांच्या चौकशीचं काय झालं? फडणवीसांच्या आरोपांचं काय झालं?, असा सवाल रोहित पवार यांनी केला. 'फडणवीसांना वाटत असेल आमची चौकशी लावली. आमच्यावर धाडी टाकल्या म्हणून आम्ही भाजपसोबत जाऊ तर तसं होणार नाही. काही लोकांच्या बाबतीत ते खरं असू शकतं, पण आम्ही झुकणार नाही. आम्ही लढणार, असं रोहित पवार यांनी सुनावलं.

WhatsApp channel