मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रोहित पवार व किशोरी पेडणेकर यांना एकाच दिवशी ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

रोहित पवार व किशोरी पेडणेकर यांना एकाच दिवशी ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2024 06:23 PM IST

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारव माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीयांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.

Rohit pawar and kishori pednekar
Rohit pawar and kishori pednekar

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा अजूनही सुरूच आहे. आदित्य ठाकरेंचे विश्वासू सूरज चव्हाण यांना अटक वशिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या चौकशीनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांना २४ जानेवारी रोजी चौकशीला बोलावलं आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. मुंबई महापालिका बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना २५ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडीने काही दिवसापूर्वी बारामती ॲग्रो कारखाना आणि याशी संबंधित सात ठिकाणी तपासणी केली होती. रोहित पवार यांच्या मालकीच्या असलेल्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावला आहे.

पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाला १२०० बॉडी बॅग प्रत्येकी ६ हजार ७१९ रुपयांना विकत घेण्यास भाग पाडल्याचाआरोप आहे, याप्रकरणी मुंबई लिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

२०२० मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. या प्रकरणात ईडीने हस्तक्षेप करत पेडणेकरांना नोटीस बजावली आहे.

WhatsApp channel