Sambhaji nagar Crime : महागड्या मोबाईलचे हप्ते फेडण्यासाठी टाकला दरोडा; सिनेमा पाहून बनवला चोरीचा प्लॅन
Sambhaji nagar Crime News : संभाजी नगर येथे एका आरोपीने त्याच्या महागड्या फोनचे हप्ते भरण्यासाठी सराफा व्यावसायिकाला लुटले असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
संभाजी नगर : संभाजी नगर येथे रांजणगाव येथे गेल्या आठवड्यात भरदिवसा एका सराफी व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून त्याला लुटण्यात आले होते. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. व्यापाऱ्याच्या हातावर चाकूने वार करत तब्बल बारा लाखांच्या एवज लंपास करण्यात आला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. महागड्या फोनचे हप्ते भरण्यासाठी त्यांनी हा दरोडा टाकल्याचे तपासात पुढे आले आहे. या यासाठी त्यांनी सिनेमा पाहून दरोड्याचा प्लॅन आखला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
Stock Market Updates : नफावसूलीचा दबाव कायम, सेन्सेक्सची ६५ हजारांखाली गटांगळी, टाटा मोटर्समध्ये २ टक्के घट
योगेश शंकर तायडे (वय २२, रा. बाळकृष्ण म्हात्रे चाळ नंबर 2, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण, जि. ठाणे, मूळ गाव नागसेननगर, पाचोरा, जळगाव), नीलेश मधुकर सोनवणे (वय १९, रा. नागसेननगर, पाचोरा, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी, गंगापूर), अरमान शेनफड तडवी (वय २४, रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
Viral News : फोटो पोस्ट करत मुलीने विचारली तिची हाइट; हातात धरलेल्या आयफोनच्या लांबीतून नेटकऱ्यांनी दिले भन्नाट उत्तर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी नगर येथील वाळूज भागातील रांजणगाव परिसरात भरदिवसा सराफा व्यावसायिकाला दुकानात जाऊन लुटले होते. तब्बल १२ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी लांपास केला होता. मुकुंद उत्तमराव बेदरे असे सराफा व्यावसायिकांचे नाव आहे. त्यांनी त्यांचे दुकान उघडले. यावेळी एकाने त्यांच्या दुकानात शिरून त्यांच्यावर हल्ला केला. दोघांमध्ये झटापट सुरू असतांना आणखी दोघे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर बंद करून त्यातील एकाने बेदरे यांच्या हातावर चाकूने वार केला.
यावेळी जिवाच्या भीतीने बेदरे हे शांत बसले. यानंतर तिघांपैकी दोघांनी रॅकमधील दागिने बँगामध्ये भरले व फरार झाले. दरम्यान, पोलिस त्यांच्या मागावर होते. त्यांनी तिघांना शिताफीने अटक केली. यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांनी महागडे मोबाइल घेतले होते. त्यांचे पैसे हप्ते भरता येत नसल्याने तिघांनी लुटीचा प्लॅन बनवला. या साठी त्यांनी दरोडा कसा करावा याचा सिनेमा पाहिला. यानंतर त्यांनी ही चोरी केली.
विभाग