पुण्यातील चितळे बंधू शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील चितळे बंधू शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील चितळे बंधू शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Updated Oct 27, 2024 12:44 PM IST

Robbery in Chitale Bandhu Shop : पुण्यातील चितळे बंधु मिठाईवाले यांच्या शॉपवर चोरट्यांनी दरोडा टाकला. यात काही रक्कम व वस्तु चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पुण्यातील चितळे बंधुच्या शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यातील चितळे बंधुच्या शॉपवर दरोडा! चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Robbery in Chitale Bandhu Shop : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. लूटमार चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंडू मिठाईवआले यांच्या औंध-बाणेर रस्त्यावरील दुकानावर दरोडा टाकला आहे. दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख व काही साहित्य लंपास केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. तसेच चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे. चोरट्यांनी दुकानातील मोठी रक्कम लंपास केली असल्याचं देखील उघड झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री चोरट्यांनी औंध-बाणेर रस्त्यावरील असलेले चितळे बंधु मिठाईवाले दुकानाचे शटर उचकटले. यानंतर, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ला फोडून आतील रोख रक्कम लुटली आहे. ही घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरटे सर्व रक्कम घेऊन पसार झाले आहेत.

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांला ७० लाखांनी लुबाडले

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. घरफोडी तसेच दुकानांवर दरोडा घालणे या गोष्टी वाढल्या आहेत. बुधवारी देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत सदाशिव पेठेतील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ७० लाख रुपये लांपास केले. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर