मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal: यवतमाळमध्ये अचानक भूमिगत पाइपलाइन फुटल्याने महिला जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Yavatmal: यवतमाळमध्ये अचानक भूमिगत पाइपलाइन फुटल्याने महिला जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2023 07:57 AM IST

Yavatmal Water Pipeline: यवतमाळमध्ये पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला.

Yavatmal
Yavatmal

Yavatmal Underground Water Pipeline Burst: यवतमाळच्या माईंदे चौक ते अँग्लो हिंदी हायस्कूल मार्गावर शनिवारी सकाळी (०४ मार्च २०२३) पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यात एक वाहनधारक तरुणी जखमी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून जमिनीतून मोठा स्फोट होऊन पाणी वर उडाल्याचे त्यात दिसते आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे यवतमाळकरांच्या जीवावर उठल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचे भिजतघोंगडे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असताना या योजनेच्या कामामुळे शहरात काही लोकांचा बळी गेला तर अनेकजन जायबंदी झाले. मात्र आज सकाळी चापडोह पाणीपुरवठा योजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन अनपेक्षितपणे फुटली. दरम्यान,पाण्याच्या प्रचंड दबाब असल्यामुळे घटनास्थळी दुचाकीवरून जाणारी महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने शहरात भितीजनक वातावरण झाले आहे.

अँग्लो हिंदी हायस्कूल नजीक मजिप्राचे कार्यालय आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्या येथे आहेत. या टाकीत चापडोह धरणातून आलेले पाणी पोहचविण्यासाठी जुनी पाईपलाईन आहे. यवतमाळ शहरात चार वर्षांपूर्वी अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पण निकृष्ट, अशी पाईपलाईन टाकण्यात आली. आज तीच पाईपलाईन फुटली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग