मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Coastal Road work : मरिन ड्राइव्हवरील महत्वाचा रस्ता बंद; दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वापरा हे ३ पर्यायी मार्ग

Coastal Road work : मरिन ड्राइव्हवरील महत्वाचा रस्ता बंद; दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वापरा हे ३ पर्यायी मार्ग

Mar 21, 2023 08:19 AM IST

Coastal Road work : मुंबईत कोस्टल मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या अंतर्गत मरीन ड्राईव मार्गाचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे येथील महत्वाचा रस्ता बंद केला जाणार असून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पर्यायी मार्ग दिले जाणार आहे.

Coastal Road work
Coastal Road work

Marine Drive rout traffic change : मुंबईत कोस्टल रोडचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या मरिन ड्राइव्ह येथील काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या या ठिकाणी ड्रेनेज आउटफॉलचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात येणार असून येथील दूसरा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग छोटा असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हे काम सुरू असल्याने पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्ग सुचवले आहे. त्यानुसार खालील मार्गाने मुंबईकरांनी आपल्या इच्छित स्थळी जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरीन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर कार्यालय, चर्चगेट जंक्शन, गोदरेज जंक्शन या मार्गे चर्चगेट तसेच दक्षिण मुंबई
  • पेडर रोड, आरटीआय जंक्शन, सेसिल जंक्शन, सुख सागर जंक्शन, (डावीकडे वळण) ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालय, चर्चगेट जंक्शन येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यास मार्ग.
  • ळकेश्वर, बँडस्टँड, विल्सन कॉलेज, विनोली चौपाटी, (डावीकडे वळण), ऑपेरा हाउस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालयामार्गे दक्षिण मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पाऊस धारा ! ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून हजेरी

सागरी किनारा बांधकाम एजन्सीने मरिन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक असून या कामासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग