मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident: पुण्यात ट्रॅव्हल्स बस १५ फूट खाली कोसळली; ८ प्रवासी जखमी

Pune Accident: पुण्यात ट्रॅव्हल्स बस १५ फूट खाली कोसळली; ८ प्रवासी जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 19, 2023 08:17 AM IST

Pune Road Accident: पुण्यातील रस्ता अपघातात आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident
Accident (HT)

Accident: मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडं जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आठ हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१८ मार्च २०२३) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुण्यातील चांदणी चौक परिसरात घडली आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडं जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही बस बायपासवरून साधारण १५ ते २० फूट खाली कोसळली. या बसमधून एकूण ३५ प्रवासी होती. यातील आठ ते दहा प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींना तातडीनं उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आलंय.या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याहून हटवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

चांदणी चौक परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव असल्यामुळे येथे अंधार असतो. यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने परिसरात दिवे बसवावेत, अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.

संगमनेर: विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार

संगमनेर- अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीत विचित्र अपघात घडला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात घडल्याची महिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp channel

विभाग