तिरुपतीला बालाजी दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
Solapur divotees accident in Tirupati : सोलापुरातील ९ भाविक कारने बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला गेले होते. दर्शन करून परतताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाला आहेत.
Road Accident in solapur : सोलापुरातून बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला गेलेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. आंध्रातील नायडूपेट-पूथलापट्टू मार्गावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती आंध्रप्रदेशातील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार दोन दिवसापूर्वी सोलापुरातील ९ तिरुपती भाविक बालाजीच्या दर्शनासाठी स्पेशल वाहन करून रवाना झाले होते. बुधवारी सर्वांनी बालाजीचे दर्शन घेतले. तिरूपती दर्शन घेऊन कनिपमकडे जाताना त्यांची कार रस्ता दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना तत्काळ तिरुपतीमधील रुईया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या