मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: आजोबांसोबत शाळेत जाताना घडलं असं काही; ४ वर्षाच्या नातीचा मृत्यू, मुंबईच्या बोरिवली येथील घटना

Mumbai: आजोबांसोबत शाळेत जाताना घडलं असं काही; ४ वर्षाच्या नातीचा मृत्यू, मुंबईच्या बोरिवली येथील घटना

Jun 28, 2024 07:07 PM IST

Mumbai Borivali Accident News: मुंबईच्या बोरीवली परिसरात आजोबांच्या दुचाकीवरून शाळेत जात असताना बसच्या धडकेत एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बोरीवली पश्चिम येथे घडली.

मुंबईच्या बोरीवली परिसरात रस्ता अपघातात एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
मुंबईच्या बोरीवली परिसरात रस्ता अपघातात एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

Mumbai Accident: मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथे धक्कादायक घटना घडली. आजोबांसोबत दुचाकीवरून शाळेत जाताना बसच्या धडकेत चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी बसचालकाला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इवा मनीष चंद्रा असे या मृत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास इवा आपल्या आजोबा नवलकिशोर प्रसाद सिंह यांच्यासोबत दुचाकीने शाळेत निघाले. मात्र, शिंपोली सिग्नलवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. डाव्या बाजूने एका वाहनाला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे दोघेही खाली पडले. यानंतर हाताला आणि खांद्याला जखमा झालेल्या सिंह यांनी दुखापत झालेल्या सिंह यांनी रिक्षा थांबवून तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न केला. इवा हिला बोरिवलीतील न्यू प्लस चिल्ड्रन रुग्णालयमध्ये नेण्यात आले. परंतु, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

बोरिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले की, बस चालक सागर तुळशीदास कोळी (वय, ३७) याला बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७९, ३३७, ३३८ आणि ३०४ (अ) अन्वये निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिंह आणि इवा या दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. सिंह यांच्या मागे बसलेल्या इवा खाली पडल्याने तिचे डोके रस्त्यावर आदळले, असे सावंत यांनी सांगितले. कोळी याला बोरिवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलेरी कोसळली

ठाण्यात दोन मजली चाळीच्या गॅलरी कोसळून दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आरडीएमसी टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर सुरक्षतेच्या कारणास्तव सदनिका रिकामी करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. गॅलरीचा उर्वरित भाग खाली पाडण्यात आला.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर