
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने दोन मित्रांनी ही कर्ज कमी करण्यासाठी आपल्याच श्रीमंत मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दारूच्या नशेत दोघांनी त्याची हत्या केली. यानंतर एक जण हा त्याच्या मुळ गावी फरार झाला तर दूसरा मुंबईत तृतीयपंथी म्हणून वावरत होता. या दोघांनाही पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सचिन हरिराम यादव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहित नागवसे आणि गोरख जनार्दन फल्ले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दोघेही हे एकमेकांचे नतेवाईक आहेत. त्यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. ते त्यांना फेडायचे होते. त्यांचा मित्र सचिन हरिराम यादव हा श्रीमंत होता. त्याची मोठी कंपनी असून यामुळे त्याला बक्कळ पैसा मिळतो हे माहिती असल्याने दोघांनी यादवला तुटल्याचा प्लॅन रचला. आरोपी रोहित हा त्यांच्याच परिसरात राहत होता. त्याने सचिन सोबत जवळीक साधत मैत्री केली. दरम्यान कंपनीचे व्यवहार करण्यासाठी सचिन जायचा तेव्हा तो आरोपी रोहितला देखील सोबत घेऊन जायचा. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी तिघेही खेड येथील जंगलात दारू प्यायला बसले होते. यावेळी दोन्ही आरोपींनी सचिनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर ते पळून गेले.
दरम्यान, सचिन घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातुन एका आरोपीचा छडा लागला. हा आरोपी मुंबईत महिनापासून तृतीयपंथी म्हणून वेश बदलून राहत होता. हा आरोपी रोहित नागवसे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या साथीदार गोरख फल्ले याला, बीड जिल्ह्यातील केज येथून अटक केली.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघेही कर्जबाजारी होते. सचिनच्या माध्यमातून फेडायचे होते. सचिनच्या कुटुंबाला लुटण्याचा प्लॅन त्यांनी केला. मात्र, त्यांनी दारूच्या नशेत सचिनचा खून केला.
संबंधित बातम्या
