येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एकावर केला गोळीबार; घटनेत टेम्पो चालकाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एकावर केला गोळीबार; घटनेत टेम्पो चालकाचा मृत्यू

येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एकावर केला गोळीबार; घटनेत टेम्पो चालकाचा मृत्यू

Nov 01, 2024 08:36 AM IST

Pune Yerwada Crime : पुण्यातील येरवडा भागांतील अशोकनगर परिसरात पार्किंगवरून वाद झाल्याने एका निर्वृत्त लष्करी अधिकाऱ्याने एकावर गोळीबार केला.

येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एकावर केला गोळीबार; घटनेत टेम्पो चालकाचा मृत्यू
येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एकावर केला गोळीबार; घटनेत टेम्पो चालकाचा मृत्यू

Pune Yerwada Crime : पुण्यात येरवडा परिसरात ऐन दिवाळीत गोलिबाराची घटना घडली आहे. पार्किंगच्या वादातून ही घटना घडली आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने एका व्यक्तिवर गोळीबार केल्याने ती टेम्पो चालकाला लागली. उपचार सुरू असतांना या टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री येरवडा येथील अशोक नगर येथे घडली घडली.

शहानवाज शेख असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. तर सेवानिवृत्त लष्करी जवान श्रीकांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा भागांतील अशोकनगर परिसरात पाटील व शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. या वादातून रागातून पाटील यांनी शहानवाज यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, शहनावाज यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती ही येरवडा पोलिसांना मिळाली. यानंतर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी पाटील याला अटक केली आहे.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एक घटना विश्रामबाग तर दुसरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने लग्नासाठी विचारणा केली. त्यानंतर तिला एका भाड्याच्या खोलीवर नेत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर आरोपी तरुण व त्याच्या काही मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर