Resident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल होणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Resident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल होणार

Resident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल होणार

Feb 22, 2024 10:25 AM IST

Resident Doctor Strike News : निवासी डॉक्टरांनी आजपासून पुन्हा राज्यव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे राज्याची आरोग्य व्यवस्था ठप्प होणार असून रुग्णांचे हाल होणार आहे.

Resident Doctor Strike
Resident Doctor Strike

Resident Doctor Strike news : राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. आज पासून सर्व डॉक्टर संपावर जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत मागण्या मान्य करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अद्याप या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी पुन्हा आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian Army : भारतीय लष्कराच्या धाडसाला सलाम! मृत्यूच्या जबड्यातून ५०० नागरिकांना काढले बाहेर, पाहा Viral Video

राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आज पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारीला संपावर जाणार होते. मात्र, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक झाल्यावर हा संप स्थगित करण्यात आल होता. मात्र, अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे आज पासून राज्यभरातील आरोग्य यंत्रणा ठप्प होणार आहे.

निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे. निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, या डॉक्टर आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.

Pune Drugs racket: पुण्यात तयार झालेल्या ड्रग्सची दिल्लीमार्गे थेट लंडनला तस्करी; तपासात उघड

दरम्यान, या मागण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल 'मार्ड'ची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, कमिशनर डीएमईआर डायरेक्टर डीएमईआर, जॉइंट सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र, अद्याप या मागण्या मान्य झालेल्या नाही.

यामुळे निवासी डॉक्टर हे ७ फेब्रुवारीला संपावर जाणार होते. मात्र, यावेळी अजित पवार यांनी बैठक घेत राज्यातील निवासी डॉक्टरांना १० तारखेच्या आत वेतन मिळेल, विद्या वेतनात १० हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती अशी विविध आश्वासणे दिली होती. मात्र, यावर दोन आठवडे होऊनही कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे आजपासून अनिश्चित काळासाठी निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर