मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Attack On Doctors : यवतमाळमध्ये रुग्णाच्या चाकू हल्ल्यात २ डॉक्टर जखमी, डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Attack On Doctors : यवतमाळमध्ये रुग्णाच्या चाकू हल्ल्यात २ डॉक्टर जखमी, डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

06 January 2023, 0:21 ISTShrikant Ashok Londhe

resident doctors on strike Yavatmal : यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात रुग्णाने दोन डॉक्टरांवर चाकूने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेमुळे खळबळ माजली आहे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Patient attack on two doctors राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र राज्यातील डॉक्टरांचा संप मिटला असला तरी यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर संपावर गेले आहेत. कारण रुग्णालयातील दोन  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर एका रुग्णाने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे रुग्णालयात खळबळ माजली आहे. डॉक्टर अभिषेक झा आणि डॉक्टर जेबीस्टन पॉल अशी जखमी डॉक्टरांची नावे आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले तसेच रुग्णालयांची तोडफोडीच्या घटना घडत होत्या. मात्र आता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांकडूनच डॉक्टरांना निशाणा बनवला जाऊ लागल्याने डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून यवतमाळमधील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. प्रशिक्षणार्थी डॉक्टर जनरल वॉर्डात राऊंडवर होते. एका रुग्णाची तपासणी करत असताना बाजुला असलेल्या रुग्णाने डॉक्टरांवर हल्ला केला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.  

हा हल्ला झाला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले की. संध्याकाळी वॉर्डमध्ये नॉर्मल सर्जरीचा राउंड सुरू होता. एका रुग्णाच्या प्रकृतीबाबत चर्चा करत असताना बाजूच्या रुग्णाने अचानकपणे डॉक्टरच्या गळ्यावर चाकून वार केला. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी रुग्णाचा हात पकडला यामुळे मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकांना आवाज दिला. मात्र, तिथे कोणीही नव्हते. डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी डॉक्टरांनी केला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

विभाग