Maha doctor strike : महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टर आज संपावर; ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार व खुनाचा निषेध-resident doctors of maharashtra and nation on strike from today protests against rape and murder of a doctor in kolkata ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha doctor strike : महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टर आज संपावर; ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार व खुनाचा निषेध

Maha doctor strike : महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टर आज संपावर; ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार व खुनाचा निषेध

Aug 13, 2024 09:48 AM IST

Kolkata Trainee Doctor murder case : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांनी आज संप पुकारला असून राज्यातील देखील डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत.

रेप मर्डर केसमध्ये कोलकात्याच्या डॉक्टरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टरांचा संप
रेप मर्डर केसमध्ये कोलकात्याच्या डॉक्टरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज महाराष्ट्रातील ८ हजार डॉक्टरांचा संप

Kolkata Trainee Doctor murder case : कोलकात्यात येथे आरजी कार मेदिल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. या आंदोलनाला राज्यातील डॉक्टरांच्या संघटनानी देखील पाठिंबा दिला आहे. तब्बल ८ हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहे. संप काळात तातडीच्या सेवा सुरू राहणार असल्याच मार्डने स्पष्ट केले आहे. 

कोलकाता इथे गेल्या शुक्रवारी एका ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ संपप्त झालेल्या डॉक्टरांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. आज १३ ऑगस्ट पासून देशातील आणि राज्यातील सर्व डॉक्टर संपावर जाणार आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने या संपाची हाक दिली होती. त्यानुसार ओपीडी आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात आपत्कालीन सेवा या सुरू ठेवल्या जाणार आहेत.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि ९) एका महिला डॉक्टरवर लैंगिक छळ करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आरोपीने तिची हत्या केल्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला.

आजच्या संपाबाबत फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ट्वीटरवर भारतभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे व डॉक्टरांच्या पाठीशी उभे असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच ट्रेनी डॉक्टरला न्याय देण्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील केले आहे. या बाबत आयएमएने केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

राज्यातील ८ हजार डॉक्टर आज जाणार संपावर

कोलकता येथील घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील डॉक्टर देखील देशव्यापी होणाऱ्या या संपात सहभागी होणार आहेत. राज्यातील ८ हजार डॉक्टर आज संपावर जाणार आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होणार आहे. दरम्यान संप काळात आपत्कालीन सेवा या सुरू राहणार असल्याचं देखील संघटनेन जाहीर केलं आहे. राज्यातील संघटनेने या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे मार्डने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.