Republic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Republic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके

Republic Day: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके

Jan 25, 2025 03:48 PM IST

Gallantry Medals : केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक

Gallantry Award List 2025: केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) मिळालेले १०१ लोक आहेत. मेरिटोरियस सेवेसाठी (MSM) पदक मिळालेले ७४६ कर्मचारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

महाराष्ट्र पोलीस सेवा दलात सेवा बजावताना अतुलनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रजाकसत्ताक दिनाच्या एक दिवस राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक व शोर्य पदकांची घोषणा केली आहे. यात पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

९४२ सैनिकांना मिळणार शौर्य आणि सेवा पदक

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण ९४२ जवानांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके जाहीर झाली आहेत. पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण ९४२ कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदक (शौर्य पुरस्कार) प्रदान करण्यात आले आहेत. या पदकांमध्ये ९५ शौर्य पदकांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि नागरी संरक्षण कर्मचारी आणि सुधारात्मक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत.

पदक प्राप्त महाराष्ट्रातील अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे : 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळवणारे अधिकारी (PSM)

1. डॉ. रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक,  

2. दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

3. सुनील बळीरामजी फुलारी, महानिरीक्षक, महाराष्ट्र

4. रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट, महाराष्ट्र

राष्ट्रपती शोर्य पदकाचे महाराष्ट्रातील मानकरी

1. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र

3. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक, महाराष्ट्र

4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक, महाराष्ट्र

5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र

6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र

7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

8. S.M.T. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक, महाराष्ट्र

11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक, महाराष्ट्र

12. रोशन रघनाथ यादव. पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

14. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

15. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक, महाराष्ट्र

22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

24. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

27. S.M.T. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

34. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर