Buldhana Crime:धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार दिल्याने डॉक्टरने महिलेला विवस्त्र करुन मारले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana Crime:धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार दिल्याने डॉक्टरने महिलेला विवस्त्र करुन मारले

Buldhana Crime:धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार दिल्याने डॉक्टरने महिलेला विवस्त्र करुन मारले

Jul 07, 2024 09:41 AM IST

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री चहा सिगरेट देण्यास नकार दिल्याने एका डॉक्टरने महिलेला विवस्त्र करत मारहाण केली.

धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार दिल्याने डॉक्टरने महिलेला विवस्त्र करुन मारले
धक्कादायक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार दिल्याने डॉक्टरने महिलेला विवस्त्र करुन मारले

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव जामोद येथे मध्यरात्री तीनच्या सुमारास एका डॉक्टरने छोटे दुकान चालवणाऱ्या एका महिलेला चहा आणि सिगरेटची मागणी केली. मात्र, उशीर झाला असल्याने दुकान उघडू शकत नाही; तुम्ही सकाळी या असे उत्तर महिलेने दिल्याने संतत्प झालेल्या डॉक्टरने महिलेला विवस्त्र करत गंभीर मारहाण केली. या घटनेत महिला ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद वानखेडे असे दुकानदार महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरच्या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातली जळगाव जमोद तालुक्यात राहणारी मारहाण झालेल्या महिलेचे किराणा मालाचे दुकान आहे. तिच्या घराजवळच तिचं दुकान आहे. शनिवारी मध्यरात्री ३ वाजता डॉक्टर गोविंद वानखडे याने या महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. तसेच तिला सिगारेट व चहाची मागणी केली.

रात्र झाली असल्याने महिलेने आरोपी डॉक्टरला नकार देत फार उशीर झाला असल्याचे सांगत उद्या येण्यास सांगितले. तिच्या या नकाराचा डॉक्टर वानखडेला राग आला. त्यानं महिलेला बेदम मारहाण केली. ऐवढेच नाही तर तिला विवस्त्र करून मारहाण केली. तिचे कपडे देखील त्याने फाडले व तिच्याशी गैरवर्तन केले. या मारहाणीत महिला जखमी झाली.

महिलेला तिच्या घरजवळच्या व्यक्तिंनी टीला दवाखान्यात नेले. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉ.गोविंद वानखेडे हा जळगाव जामोद शहरात मोठा दवाखाना चालवतो. सध्या आरोपी डॉक्टर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर